AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सक्षमचा छोटा भाऊ… मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलचा धक्कादायक खुलासा, सासर का सोडलं?

Nanded Anchal Mamidwar Case: नांदेडमध्ये सक्षम ताटे या युवकाची प्रेयसीच्या कुटुंबियांनी हत्या केली. त्यानंतर प्रेयसी आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले. पण आता आंचल सक्षमचं घर सोडून पुन्हा आपल्या घरी गेल्याची माहिती समोर येत आहे.

सक्षमचा छोटा भाऊ... मृतदेहासोबत लग्न करणाऱ्या आंचलचा धक्कादायक खुलासा, सासर का सोडलं?
Saksham tateImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 13, 2026 | 5:18 PM
Share

सहा महिन्यांपूर्वी नांदेड येथील एक प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात सक्षम ताटे याची प्रेयसीच्या भावांनी आणि वडिलांनी मिळून निर्घृण हत्या केली. त्यानंतर सक्षमची प्रेयसी आंचलने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. तसचे आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करुन आयुष्यभर त्याच्या घरी राहणार असल्याचे सांगितले. मात्र, आता आंचल घर सोडून गेली असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व चर्चांनंतर आंचल मामिडवारने प्रतिक्रिया दिली आहे.

लहान भावाबाबत धक्कादायक खुलासा

आंचल मामिडवारने नुकताच एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने थेट घर का सोडलं याबाबत सांगितलं आहे. सक्षमची आई संगीता ताटे यांनी हा आरोप केला होता की आंचलने आजीकडे जायचा बहाणा करून घर सोडले. त्यावर बोलताना आंचल म्हणाली की, सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता, म्हणून सगळ्यांना सांगून घर सोडले आहे. आंचलच्या या वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

काय म्हणाली आंचल?

सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याने आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप आंचलने केला आहे. ही बाब मी सक्षमच्या कुटुंबीयांना देखील सांगितली. मात्र त्यांनी विश्वास ठेवला नाही. पुढे काही चुकीचे घडले तरी सक्षमचे कुटुंबीय विश्वास ठेवणार नाहीतय म्हणून मी सर्वांना सांगून, पोलिसांना कल्पना देऊन घर सोडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः सोबत येऊन मला माझ्या वडिलांच्या घरी सोडले. सध्या मी वडिलांच्या घरी राहत असल्याचे आंचलने यावेळी सांगितले.

ट्रोलर्सला देखील सडेतोड उत्तर

आंचलने सक्षमचे घर सोडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रचंड पसरल्या आहेत. त्यावरुन आंचलला ट्रोल केले जात आहे. याबाबत बोलताना तिने नाराजी व्यक्त केली आहे. सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करू नये असे आंचल थेट म्हणाली आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार