AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिंता वाढली! रोहित पवारांच्या प्रकृतीविषयी रिपोर्ट आला, अन्नत्याग आंदोलनाने शरीरातील साखर…सरकारवर दबाव वाढणार?

मी आज, उद्या इथे बसेन पण परवा मात्र नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसणार आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता पंढरपुरातील आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

चिंता वाढली! रोहित पवारांच्या प्रकृतीविषयी रिपोर्ट आला, अन्नत्याग आंदोलनाने शरीरातील साखर...सरकारवर दबाव वाढणार?
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2026 | 5:19 PM
Share

Rohit Pawar Protest : राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. परंतु ही कर्जमाफी करताना सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. विरोधकांनी ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला आहे. कर्जमाफीसाठीच्या अटी मागे घ्याव्यात तसेच सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार विठुरायाच्या पंढरपुरात उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत मी माझे अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा धारण केला आहे. आता तर रोहित पवार यांनी आणखी कठोर पद्धतीने उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. रोहित पवार यांच्या या भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता रोहित पवार यांच्या प्रकृतीविषयी मोठी आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे.

दत्तमामा मागण्यांसाठी सकारात्मक

रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना अन्नत्याग आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याविषयी सविस्तर सांगितले. मला एसपी साहेबांचा कॉल आला होता. कृषी मंत्र्यांसोबतही माझा कॉल झाला होता. कृषीमंत्री भरणेमामा बीडला गेल्यावर म्हणाले की मंगळवारी आम्ही मुंबईत सर्व मंत्री येणार आहेत. मंगळवारी मला त्यांनी बैठकीला बोलावले आहे. मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांचे आहे. त्यासाठी सरकार विशेष बैठत घेऊ शकतं. दत्तमामा माझ्या मागण्यांसाठी सकारात्मक आहेत. मात्र आम्हाला बोलण्याला मर्यादा आहेत असं ते म्हणत आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री यांना विनंती आहे की ज्या अटी लावल्या आहेत त्या काढाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

माझा परिवार चिंतेत आहे

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आघाडीतला मित्रपक्ष म्हणून आमच्या ज्या दोन मागण्या आहेत त्याबाबत आश्वासन द्यावे. भाजप किंवा इतर सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने आम्ही या दोन अटी मान्य करायला तयार आहोत, असे पुढे येऊन सांगितले पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी त्यांनी मांडली. माझा परिवार चिंतेत आहे. माझे वडील इथे बसून आहेत. माझ्या मुलांना हे आंदोलन काय असते हे माहिती नाही. मात्र मुलही म्हणतात आम्ही पण जेवण बंद करतो. माझी पत्नी पण खूप चिंतेत आहे, अशी माहिती यावेळी रोहित पवार यांनी दिली आहे.

मी आज, उद्या इथे बसेन पण परवा…

राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत आहेत. आम्हाला या कर्जमाफीचा काही उपयोग नाही. त्यामुळे आपल्या मागण्या रास्त आहेत, अशी भूमिका या शेतकऱ्यांची आहे. बीडमध्ये काही शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांची गाडी अडवली. मी आज, उद्या इथे बसेन पण परवा मात्र नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसणार आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी

दरम्यान, रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाली आहे. त्यांच्या शरीरातील साखर 83 mgdl इतकी कमी झाली आहे. रोहित पवारांनी ORS घेतले पाहिजे असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. जर ORS घेतले नाही तर त्यांना सलाईन लावण्याची गरज पडेल, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांनी आराम केला पाहिजे, लोकांशी बोलू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकार नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती