Rohit Pawar: कर्जमाफी फसवीच नाही आजारी… आता माघार नाही… रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम… सरकारला सुनावले काय?

Rohit Pawar Hunger Strike Pandharpur: सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी पांडुरंगाच्या पंढरीत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांची शुगर कमी झाली आहे. त्याचवेळी त्यांनी आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा सरकारला दिला आहे.

Rohit Pawar: कर्जमाफी फसवीच नाही आजारी... आता माघार नाही... रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम... सरकारला सुनावले काय?
आता माघार नाही -रोहित पवार
Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 13, 2026 | 11:01 AM

Rohit Pawar Hunger Strike Pandharpur: सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. विठुरायाच्या पंढरपुरात हे आंदोलन सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साताबारा कोरा करण्यासाठी रोहित पवार यांचे आंदोलन सुरू आहे. कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. पण जोपर्यंत मागण्यांवर विचार होत नाही, तोपर्यंत आंदोलनात माघार घेणार नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही

आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू आहे. माझा बीपी व्यवस्थित आहे मात्र शुगर कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल असल्याचे रोहित पवार म्हणाले. कर्जमाफीतील काही जाचक अटी सरकारने घातल्यात. त्या मागे घेतल्याशिवाय आमचे अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवार यांना चर्चेचे निमंत्रण दिले, त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांना जोरदार टोला

2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केव्हा 50 हजार पर्यंत कर्जमाफी म्हणजे सरकारकडून शेतकऱ्याची फसवणूक आहे. आज अजित दादा असते तर असा जीआर निघालाच नसता. शेतकर्‍यांसाठीच्या आंदोलनाला नौटंकी म्हणत असतील तर अशा मंत्र्यांशी आम्ही संवाद करणार नाही. मुळात त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही. पालकमंत्र्यांना जीआर तरी वाचता येतो का हा प्रश्न आहे, असा जोरदार टोला आमदार रोहित पवार यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला. मंत्री गोरे यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीका केली होती. हे आंदोलन नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सरकारला उद्या अल्टिमेटम

मी सरकारला आज अल्टीमेटम देणार नाही मात्र उद्या त्यांना अल्टीमेटम देणार असे रोहित पवार म्हणाले. मुळात आता शेतकऱ्यांना या कर्जमाफिचा फसवेपणा कळत आहे त्यामुळे कुठे काही झाले तर त्याला आम्ही जबाबदार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जो बैल दिला तो आजारी होता. त्याप्रमाणेच सरकारची कर्जमाफी देखील आजारी आहे, अशी खरमरीत टीका रोहित पवार यांनी केली. यापूर्वी त्यांनी ही कर्जमाफी फसवी असल्याचे म्हटले होते. तर सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला. आता सरकार याप्रकरणी कोणता तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Follow Us