गोपीनाथ मुंडेंच्या तृतीय कन्येचं ऐतिहासिक पाऊल, एका निर्णयानं महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता यशश्री मुंडे यादेखील राजकारणात सक्रिय होणार का? अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत.

गोपीनाथ मुंडेंच्या तृतीय कन्येचं ऐतिहासिक पाऊल, एका निर्णयानं महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?
Yashashree Munde
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 12, 2025 | 5:11 PM

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. यशश्री मुंडे निवडणुकीच्या निमित्ताने आता पहिल्यांदा मैदानात असतील. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता यशश्री मुंडे यादेखील राजकारणात सक्रिय होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच यावर प्रतिक्रिया येत असल्याचे देखील दिसत आहे.

वैजनाथ बँक ही अनेक दशक गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाच्या ताब्यात राहिली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आता एकत्र आल्यानंतर ही निवडणूक फारशी कठीण जाणार नसल्याचे खरं असलं तरी यानिमित्ताने यशश्री मुंडे यांनी देखील बँकेच्या निवडणूक रिंगणामध्ये उडी घेतली. महिला वर्गामध्ये खासदार प्रीतम मुंडे यांचा बिनविरोध निघण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

वाचा: पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढवणारे मंत्री संजय शिरसाट किती कोटींचे मालक?

डॉ. शालिनी कराड यांनी दिली प्रतिक्रिया

‘आमच्या साहेबांच्या लाडक्या यशोताई राजकारणात येत असतील तर स्वागतच आहे. पहिली गोष्ट राजकारणामध्ये त्यांच्या मोठ्या ताई मंत्री पंकजा मुंडे देशाचे नेतृत्व करतात तर दुसरीकडे माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक जिल्ह्यातून मते घेतली होती. या दोघींचाही अनुभव येशू ताई यांना मिळणार आहे. येशू ताई सोबत यश आहे असं दिवंगत लोकनेते मुंडे साहेबांना वाटायचं. बाहेर देशात शिकून येशू यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. कायद्याचं आणि संविधानाचं ज्ञान त्यांना खूप जास्त आहे. त्या गोष्टीचा वापर राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी नक्कीच होईल व याच स्वागत केलं पाहिजे. याचा नक्कीच फायदा भारतीय जनता पार्टीला होईल’ असे शालिनी कराड यांनी म्हटले आहे.

निवडणूक बिनविरोध होणार की चुरस वाढणार?

निवडणुकीचे अर्ज 14 जुलै रोजी छाननीसाठी घेतले जाणार असून, 15 ते 29 जुलैदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. यानंतरच निवडणुकीचे स्वरूप स्पष्ट होईल. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून, 10 ऑगस्ट रोजी मतदान आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. यापूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येऊन बिनविरोध यश मिळवले होते. यंदाही दोघे एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

17 जागांसाठी 71 अर्ज

सर्वसाधारण मतदारसंघातील 12 जागांसाठी 52 अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी 4 अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती (विमाप्र) च्या एका जागेसाठी 4 अर्ज, इतर मागासवर्गीय (ओबीसी) साठी एका जागेसाठी 6 अर्ज, आणि महिलांसाठी राखीव दोन जागांसाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळ यंदा बिनविरोध निवडले जाणार की निवडणूक होणार, याबाबत उत्सुकता आहे.