AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेळता खेळता कारमध्ये शिरला अन्… चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

यवतमाळमध्ये ४ वर्षाच्या चिमुकल्याचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कारचा दरवाजा उघडा असताना चिमुकला कारमध्ये शिरला.

खेळता खेळता कारमध्ये शिरला अन्... चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
| Updated on: Sep 18, 2026 | 2:28 PM
Share
यवतमाळमध्ये ४ वर्षाच्या चिमुकल्याचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कारचा दरवाजा उघडा असताना चिमुकला कारमध्ये शिरला. मात्र त्यानंतर दरवाजा बंद झाल्यामुळे मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला. घरासमोर खेळत असताना शेजारी उभे असलेल्या कार मध्ये गेलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. कार मध्ये बराच वेळ अडकून राहिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली होती त्यानंतर त्याला उपचारार्थ दाखल केले मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची ही घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे घडली आहे. अंश सुरज केळझरकर असे मृत्यू झालेल्या चार वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे.

अंश हा घराबाहेर खेळत असताना खेळता खेळता शेजारी उभ्या असलेल्या कार मध्ये गेला मात्र कारमधून बाहेर पडता न आल्याने तो बराच वेळ आताच अडकून राहिला. त्यानंतर चिमुकला हा कुठेच दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली त्यावेळी चिमुकला बेशुद्ध अवस्थेत कार मध्ये आढळून आला त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी चिमुकल्याला उपचार करण्यासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचार करत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या वृत्तानिसार, ४ वर्षाचा अंश नेहमीप्रमाणे आपल्या घराबाहेर खेळत असताना तो खेळता खेळता तो शेजारीच उभ्या असलेल्या एका कारमध्ये शिरला. कारचा दरवाजा उघडून तो आत गेला. मात्र, दुर्दैवाने कारचा दरवाजा आतून अचानक लॉक झाला आणि त्याला तो परत उघडता आला नाही, ज्यामुळे बराच वेळ कारमध्ये तो अडकून राहिला.
कुटुंबीयांनी त्याला तत्काळ कारमधून बाहेर काढले. उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अंशवर उपचार सुरू केले, मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा  अंत झाल्याने केळझरकर कुटुंबाच्या पायाखालची जमिनच हादरली.  या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow Us
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?