AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियतीच्या मनात वेगळच होतं… सव्वा महिन्याच्या संसाराचा विहिरीत उडी घेऊन शेवट, पोटाला दगड बांधला अन्… यवतमाळमध्ये हळहळ

यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याने अवघ्या सव्वा महिन्याच्या संसारानंतर आत्महत्या केली. पोटाला दगड बांधून दोघांनी विहिरीत उडी घेतली. आशिष आणि करिष्मा धानोरकर या दाम्पत्याच्या जीवनाचा असा हृदयद्रावक शेवट झाल्याने यवतमाळ हादरले आहे.

नियतीच्या मनात वेगळच होतं... सव्वा महिन्याच्या संसाराचा विहिरीत उडी घेऊन शेवट, पोटाला दगड बांधला अन्... यवतमाळमध्ये हळहळ
पती पत्नीच्या मृत्यून यवतमाळ हादरलं
| Updated on: Jun 10, 2026 | 2:20 PM
Share

जन्मोजन्मी एकमेकांना साथ द्यायची. एकमेकांशिवाय राहणं शक्यच नाही, असं म्हणत काही वर्ष प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्याने लग्न केलं. आता आपल्या जीवनाची गाडी सुरळीत सुरू राहील असं त्यांना वाटलं. आता सुखाने संसार करू, मेहनत करून आपलं विश्व निर्माण करू, असं स्वप्नही त्यांनी पाहिलं. पण अवघ्या सव्वा महिन्याचाच संसार करावा लागेल असं त्यांना कुठे माहीत होतं? मात्र, नियतीच्या मनात वेगळच होतं. या जोडप्याने अंगावरची हळदही सुकू दिली नाही. अवघ्या सव्वा महिन्यातच त्यांनी जीवनाची अखेर केली. दोघांनीही विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनेमुळे यवतमाळ हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे.

प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याने लग्नाला सव्वा महिनाही पूर्ण होण्यापूर्वी विहिरीत उडी घेऊन आयुष्याचा शेवट केला. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे घडली. आशिष रमेश धानोरकर आणि करिष्मा आशिष धानोरकर असं या दाम्पत्याचं नाव आहे. या दोघांनीही टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघेही सुस्वभावी होते. सर्वांशी हसून बोलायचे. मेहनती होते, त्यांनी असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, असं स्थानिक म्हणत आहेत.

वणीला जायला निघाले अन्…

आशिष आणि करिष्मा हे दोघेही कॅटरर्सच्या कामात एकत्र मजूर म्हणून काम करत होते. त्याचवेळी दोघांचे सूत जुळले होते. त्यानंतर 4 मे 2026 रोजी दोघांनी लग्नही केलं. लग्न होईल की नाही ही धाकधूक असताना दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून एकमेकांना कायमची साथ देण्याचा निर्णय घेतला. सव्वा महिना आनंदात गेला. अंगावरची अजून हळद सुकलीही नव्हती. पण सोमवारचा दिवस वाईट बातमी घेऊन आला.

सोमवारी हे दोघेही वणीला जाण्याचे सांगून ते घरातून बाहेर पडले. मात्र त्यांनी सगणापूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. दोघांनीही नवरगाव शिवारातील अनिल झाडे यांच्या शेतात आल्यावर पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेतली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अंगावरील हळद सुकण्यापूर्वीच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

वाऱ्यासारखी बातमी पसरली…

काही वेळाने विहिरीत दोन मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली. झाडेंच्या शेतात मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् अख्खा गाव विहिरीभोवती जमा झाला. विहिरीच्या बाजूला मोटारसायकल आणि दोघांच्या चपला फक्त होत्या. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आशिष हा एकुलता एक होता.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा