Yavatmal Women Death | प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरांचा निष्काळजीपणा मृत्यूला जबाबदार असल्याचा नातेवाईकांचा आरोप, यवतमाळात नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 04, 2022 | 2:52 PM

डॉ. अरुणा पापळकर यांनी महिलेचे सीझर केले. तेव्हा त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु एक-दोन तासातच त्या महिलेची प्रकृती खालावली. महिलेचा रक्तस्राव जास्त होत असल्याने नातेवाईकांनी दहा बॉटल रक्तसुद्धा खरेदी करून आणले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

Yavatmal Women Death | प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरांचा निष्काळजीपणा मृत्यूला जबाबदार असल्याचा नातेवाईकांचा आरोप, यवतमाळात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांचा निष्काळजीपणा मृत्यूला जबाबदार असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Image Credit source: t v 9
Follow us on

यवतमाळ : पुसद (Pusad) येथील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Medicare Multispeciality Hospital) सिझर करत असताना मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. पुन्हा आज सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास प्रसुती दरम्यान सीझर करण्यात आलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये सीझरिंगमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वाढत्या प्रकारामुळे मेडिकेअर मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलच्या निष्क्रिय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पुसद येथील मेडिकेअर मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये काल रात्रीच्या सुमारास माधुरी विलास व्हडगीर (Madhuri Vilas Vadgir) (वय 22 वर्षे रा. वेणी) हिला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी नॉर्मल प्रसूती न करता सीझर करण्याचा सल्ला नातेवाईकांना देण्यात आला. तशी नातेवाईकांनी डॉक्टरांना सीझर करण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली.

दहा बॉटल रक्त खरेदी केले

डॉ. अरुणा पापळकर यांनी महिलेचे सीझर केले. तेव्हा त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु एक-दोन तासातच त्या महिलेची प्रकृती खालावली. महिलेचा रक्तस्राव जास्त होत असल्याने नातेवाईकांनी दहा बॉटल रक्तसुद्धा खरेदी करून आणले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे नातेवाईकांना माधुरीचा मृत्यू झाल्याचे समजताच महिलेच्या सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात संतप्त होऊन आलोट गर्दी केली.

रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष

रुग्णालय प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तातडीने पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. परंतु मयत महिलेच्या नातेवाईकांनी मेडिकेअर हॉस्पिटल डॉक्टरांच्या विरोधात वसंतनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून वसंतनगर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. सदर मृतदेह यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवणार असल्याची माहिती दिली आहे. परंतु मेडिकेअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सीझरिंग करतानाचा निष्काळजीपणा एका तरुण महिलेच्या जीवावर बेतला. त्यामुळे फक्त लग्नाला 1 वर्षे झालेल्या विवाहित महिलेला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे.

हे सुद्धा वाचा