Video | माजी क्रीडा राज्यमंत्री कबड्डीच्या मैदानात, संजय देशमुखांनी थोपटल्या मांड्या, यवतमाळात खेळाडूंनी कसे केले बाद?

यवतमाळ जिल्ह्यात कबड्डीचे सामने ठेवण्यात आले होते. या सामन्यात माजी क्रीडा राज्यमंत्री मैदानात उतरले. त्याठिकाणी त्यांनी दंड थोपाटले. पण, गेल्या विधानसभा निवडणुकीत ते हरले होते. अशीच काहीशी अवस्था या खेळातही झाली. खेळाडूंनी त्यांना बाद केले.

Video | माजी क्रीडा राज्यमंत्री कबड्डीच्या मैदानात, संजय देशमुखांनी थोपटल्या मांड्या, यवतमाळात खेळाडूंनी कसे केले बाद?
दिग्रस येथे कबड्डी खेळताना माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख.
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 4:18 PM

यवतमाळ : देशात प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगचे वातावरण आहे. प्रो कबड्डीमुळं कबड्डीपटूंनाही चांगले दिवस आलेत. त्यामुळं कबड्डी स्पर्धेला बळ मिळालंय. यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस शहराला (Kabaddi matches at Digras) कबड्डीची पंढरी समजली जात असे. सध्या कबड्डी खेळाचे प्रमाण कमी झाले होते. कोरोनामुळं खेळावरही बंदी आली होती. हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही कबड्डीचे आयोजन केले जाते. या सामन्यांना मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले जाते. दिग्रस येथील सामन्यात माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख ( Former Minister of State for Sports Sanjay Deshmukh) यांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळं त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपणही कबड्डी खेळावे, असा मोह झाला. आणि देशमुख थेट कबड्डीच्या मैदानात उतरले….

संजय देशमुख झाले बाद

माजी क्रीडा राज्यमंत्री असल्याने त्यांनी कबड्डीच्या मैदानात उडी घेतली. कबड्डी कबड्डी म्हणून मांड्या थोपाटल्या. थेट चढाई केली. खेळाडू तरबेज होते. त्यांना सुरुवातीला संजय देशमुख यांना चांगले खेळू दिले. देशमुखही चांगलेच रमले होते. अशात ते खेळाडू बाद करण्याच्या बेतात होते. पण, खेळाडूंनीच त्यांच्यावर चढाई केली. सीमेच्या आतच अडविले. त्यामुळं ते सीमारेषा क्रास करू शकले नाही. अशाप्रकारे संजय देशमुख बाद झाले.

पाहा व्हिडीओ

खिलाडी वृत्ती कायम

पाहुणे म्हणून आलेल्या संजय देशमुख कबड्डीच्या मैदानात उतरले. त्यामुळं खेळाडूंमध्ये उत्साह संचारला होता. पण, त्यांना बाद केल्याशिवाय खेळाडूही काही शांत बसले नाहीत. क्रीडा राज्यमंत्री राहिलेले देशमुख २०१९ च्या निवडणुकीत निवडूण आले नाहीत. त्यामुळं त्यांना विधानसभेच्या बाहेर व्हावे लागले. कबड्डीच्या खेळातही खेळाडूंनी त्यांना बाद केले. म्हणून काय झाले. संजय देशमुख हे खेळाडू आहेत. खिलाडी वृत्तीनं खेळत राहू. हरलो म्हणून काय झालं, असं देशमुख म्हणाले.

Video – संजय राऊतांचा नारायण राणेंवर आरोप, मुख्यमंत्री केव्हा मौन सोडणार?, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष, तीन वर्षांत 211 जणांचा प्राण्यांनी घेतला बळी, एकवीस हजारांच्या वर प्राण्यांनाही गमवावा लागला जीव

महाठग निशीद वासनिकला ठोकल्या बेड्या, नागपूरच्या पोलिसांची लोणावळ्यात कारवाई, गुंतवणूकदारांची कशी केली होती फसवणूक?