मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष, तीन वर्षांत 211 जणांचा प्राण्यांनी घेतला बळी, एकवीस हजारांच्या वर प्राण्यांनाही गमवावा लागला जीव

मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष कायम आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या तीन वर्षांत 211 जणांना आपले प्राण गमवावे लागले. एकवीस हजार सहाशेच्या वर वन्यप्राण्यांनाही मानवी हस्तक्षेपामुळं (Human Intervention) आपले जीव गमवावे लागले. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीवरून ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे.

मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष, तीन वर्षांत 211 जणांचा प्राण्यांनी घेतला बळी, एकवीस हजारांच्या वर प्राण्यांनाही गमवावा लागला जीव
वनविभागाचे प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 12:17 PM

नागपूर : अभय कोलारकर हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. अभय कोलारकर (Abhay Kolarkar, Right to Information Activist) यांनी वन विभागाकडे 2019 ते डिसेंबर 2021 या तीन वर्षांच्या कालावधीतील माहिती मागितली. यात त्यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किती मनुष्यांचा मृत्यू झाला, किती जण जखमी झालेत, हे विचारले होते. वन विभागाच्या जनमाहिती अधिकारी (Public Information Officer of Forest Department ) कक्षाकडून कोलारकर यांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली. त्या माहितीनुसार वर्ष 2019-20 मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात (In the attack of wild animals) राज्यात 47 जणांचा बळी गेलाय. तर 412 जण जखमी झालेत. 2020-21 मध्ये 80 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 400 जण गंभीर जखमी झाले. 2021 च्या डिसेंबरअखेरपर्यंत 84 जणांचा वन्य प्राण्यांनी बळी घेतला, 56 जण जखमी झालेत.

तीन वर्षांत एकवीस हजारांवर वन्यप्राणी दगावले

2021 मध्येच चंद्रपूर ताडोबा अंधरी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलार वनपरिक्षेत्रात वनरक्षक स्वामी एन. ढुमने या अधिकार्‍यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. अहमदनगर विभागातील राहुरी वनपरिक्षेत्रातील वनमजूर लक्ष्मण गणपत किनकर यांचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला. याच तीन वर्षांच्या कालावधीत 21 हजार 610 पशुंचा मृत्यू झालाय. 281 पशुधन जखमी झाले. तसेच वन्यप्राण्याच्या झुंजीत 2019 मध्ये वाघासह बिबट अशा 19 वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. 2020 मध्ये 23 आणि 2021 मध्ये सहा वाघांसह 21 बिबट व 1 अस्वल असे 28 वन्यप्राणी आपसी झुंझीत दगाविले. अशी माहिती माहिती अधिकाराअंतर्गत वन विभागाने दिली आहे.

दोनशे कोटी रुपयांवर पिकांचे नुकसान

19 ते 21 या तीन वर्षांच्या कालावधीत वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचेही नुकसान झाले. शेतकर्‍यांना नुकसानीपोटी किती रुपयांची भरपाई दिली, अशी माहिती कोलारकर यांनी मागितली होती. त्यावर विभागाने त्यांना दिलेल्या माहितीनुसार 2019-20 मध्ये 38 हजार 347 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना 70 कोटी रुपयांची भरपाई दिली. 2020-21 मध्ये 30 हजार 953 हेक्टर पिकांसाठी 80 कोटी रुपयांची नुकसान भरपराई देण्यात आली. 2021 च्या डिसेंबरअखेरपर्यंत 8 हजार 796 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना 59 कोटी 36 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. अशी तीन वर्षात शेतकर्‍यांना 209 कोटी 36 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली. यावरून प्राणी मानवाचे नुकसान करतात, तर मानव प्राण्याचे नुकसान करतो, हे पुन्हा एका सिद्ध झालं. पण, यात दोघांचेही नुकसान होतो. त्यामुळं यातून काय तो मध्यममार्ग वनविभागाला काढावा लागेल.

महाठग निशीद वासनिकला ठोकल्या बेड्या, नागपूरच्या पोलिसांची लोणावळ्यात कारवाई, गुंतवणूकदारांची कशी केली होती फसवणूक?

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात आजपासून कोविड निर्बंध शिथिल, काय राहणार नवीन नियमावली?

Nagpur | वर्षातून तेरा दिवस वाजवा रे वाजवा!, पण, मर्यादेचे पालन करा, केव्हा वाजविता येणार दिवसभर ध्वनिक्षेपक?

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.