मोठी बातमी! अखेर पार्थ पवारांनी मुंबईत डाव टाकला; झिशान सिद्दीकी यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

झिशान सिद्दिकी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्या हस्ते झिशान सिद्धकी यांना नियुक्ती पत्र देण्यात आलंय.

मोठी बातमी! अखेर पार्थ पवारांनी मुंबईत डाव टाकला; झिशान सिद्दीकी यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
zishan siddiqui
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 28, 2026 | 10:13 AM

राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांवरील मतदानानंतर मतमोजणी सुरू असताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते पार्थ पवार यांनी मुंबई मोठा डाव टाकला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत झिशान सिद्दिकी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी यांची वर्णी लागली आहे. सिद्दिकी यांच्या नियुक्तीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

झिशान सिद्दिकी हे विधान परिषद सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांना साथ दिली होती. तर विधानसभा निवडणुकीआधीच झिशान सिद्दिकी यांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.  विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यानंतरही विधानपरिषदेची उमेदवारी देताना झिशान सिद्दिकी यांना प्राधान्य देण्यात आलं होतं.  आता पक्षाने मुंबईतही राष्ट्रवादीने आमदार झिशान सिद्दिकी यांना मोठी जबाबदारी दिली आहे. झिशान सिद्दिकी यांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्या हस्ते झिशान सिद्दिकी यांना नियुक्त पत्र देण्यात आलं आहे.

Loading...

कोण आहेत झिशान सिद्दिकी?

झिशान सिद्दिकी हे बाबा सिद्दिकी यांचं पुत्र आहेत. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यावेळी निवडणुकीत सर्वात कमी वयाचे आमदार ठरले होते. त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला होता. त्याकाळी सर्वात तरुण आमदार ठरले होते.  त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. त्यांनीह धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या राजकीय प्रवासात धक्कादायक वळण लागलं. त्यांनी 12 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर राज्यातही मोठी घडामोड झाल्याचे दिसून आलं.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात निवडणूक लढली होती. त्यांनी या निवडणुकीत 46,343 मते मिळाली होती. तर या निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. परंतु विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं. आता झिशान यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us