AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधेरी स्टेशनवर एस्कलेटर अचानक उलट्या दिशेने, ऐन गर्दीत प्रवाशांमध्ये गोंधळ

अंधेरी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर दादरकडील दिशेला असलेला सरकता जिना वर जाताना अचानक खालच्या दिशेने फिरु लागला

अंधेरी स्टेशनवर एस्कलेटर अचानक उलट्या दिशेने, ऐन गर्दीत प्रवाशांमध्ये गोंधळ
| Updated on: Feb 19, 2020 | 4:04 PM
Share

मुंबई : गर्दीने गजबजलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकावर सरकता जिना (एस्कलेटर) अचानक उलटा जाऊ लागल्याने एकच गोंधळ (Andheri Station Escalator) उडाला. प्रवासी एकमेकांवर आदळून दोघं जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

प्रभादेवी अर्थात एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची दुर्घटना आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ताजे असतानाही रेल्वे प्रशासनाने काहीच बोध घेतल्याचं दिसत नाही. मुंबईतील पश्चिम रेल्वेवर असलेल्या अंधेरी स्थानकावर कायम प्रवाशांची गर्दी असते. त्यातच प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर दादरकडील दिशेला असलेला सरकता जिना अचानक उलटा फिरु लागला. सोमवारी (17 फेब्रुवारी) संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला.

सरकता जिना वर जाण्याऐवजी खालच्या दिशेने जाऊ लागल्याने प्रवासी एकमेकांवर आपटले. त्यापैकी दोघेजण किरकोळ जखमी झाले. हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सरकत्या जिन्याचा प्रवास उलट दिशेने सुरु असतानाच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत जिना थांबवण्यासाठी असलेले आपत्कालीन बटण दाबले. परिणामी जिना त्वरीत थांबला.

देखभाल-दुरुस्तीअभावी एस्कलेटरचा प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचं या घटनेवरुन दिसून आलं. पुलावर जाण्यासाठी पायऱ्या चढण्याचा त्रास वाचवण्यासाठी या सरकत्या जिन्यांचा वापर हजारो प्रवाशांकडून करण्यात येतो. मात्र हा ‘शॉर्टकट’ जीवावर बेतण्याची भीती प्रवाशांमध्ये (Andheri Station Escalator ) आहे.

पाहा व्हिडीओ :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.