AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona death | मुंबई-वाशी-दिल्ली पुन्हा नवी मुंबई प्रवास, फिलिपिन्सच्या नागरिकाचा मुंबईत मृत्यू, धाकधूक वाढली

कोरोना विषाणूने हातपाय पसरले आहेत. त्याला रोखणं दिवसेंदिवस कठीण होताना (Philippines citizen death corona) दिसत आहे.

Corona death | मुंबई-वाशी-दिल्ली पुन्हा नवी मुंबई प्रवास, फिलिपिन्सच्या नागरिकाचा मुंबईत मृत्यू, धाकधूक वाढली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 23, 2020 | 11:45 AM
Share

मुंबई : कोरोना विषाणूने हातपाय पसरले आहेत. त्याला रोखणं दिवसेंदिवस कठीण होताना (Philippines citizen death corona) दिसत आहे. कारण दिवसेंदिवस महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच, मृतांची संख्याही (Philippines citizen death corona) वाढत आहे. फिलिपिन्सच्या 68 वर्षीय नागरिकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. या नागरिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार केल्यानंतर मग त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला.

फिलिपिन्सच्या नागरिकाचा मृत्यू झाला हे खरं आहे, पण त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला का हे अद्याप समजलं नाही. त्यांची माहिती घेत आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

फिलिपिन्सच्या नागरिकाचा मुंबई-दिल्ली प्रवास

दरम्यान, मृत्यू झालेल्या या फिलिपिन्सच्या नागरिकाने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केलं होतं. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला होता. Philippines Corona patient Journey in India)

दुबईतून आलेल्या प्रवाशांनी महाराष्ट्रात कोरोना आणल्याचं समोर आलं होतं. पण, कोरोनानं फिलिपीन्समार्गेही भारतात प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. एका धार्मिक कार्यक्रमासाठी फिलिपीन्समधून 68 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण एकूण 10 जणांच्या गटासह मुंबईत आला. तो सर्वात अगोदर मुंबईत आला. त्यानंतर तो नवी मुंबईत गेला आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून दिल्लीला गेला. विशेष म्हणजे त्यानंतर तो दिल्लीतून पुन्हा मुंबईत आला आणि नवी मुंबईतील वाशी येथे गेला.

तिथे रुग्णाची प्रकृती खालावली आणि त्याला वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला उपचारासाठी थेट कस्तुरबा रुग्णालयात हलवणलं. कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.

धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या या फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं आणि त्यांच्या चाचण्या करण्याचं नवं आव्हान यंत्रणेसमोर उभं ठाकलं आहे. कोरोनाचा धोका टाळणं ही केवळ सरकार आणि महापालिकांचीच जबाबदारी नाही. तर खासगी संस्था आणि असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनीदेखील काळजी घेण्याची गरज आहे.

फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

  • 3 मार्च – फिलिपिन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांना गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली.
  • 5 मार्च – फिलिपिन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला.
  • 6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली
  • 7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला
  • 10 मार्च – रेल्वे मार्ग हा गट दिल्लीतून मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला
  • 10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 68 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले
  • 12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं
  • 13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या
  • 14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं
  • 17 मार्च – 68 वर्षीय बाधिताची प्रकृती खालावली , त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं
  • 23 मार्च – बाधित रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • मुंबई – 39
  • पुणे – 16
  • पिंपरी चिंचवड – 12
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 4
  • कल्याण – 4
  • नवी मुंबई – 3
  • अहमदनगर – 2
  • पनवेल – 1
  • ठाणे -1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • उल्हासनगर – 1

एकूण 89

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
  • मुंबई (1) – 18 मार्च
  • रत्नागिरी (1) – 18 मार्च
  • मुंबई महिला (1) – 19 मार्च
  • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
  • अहमदनगर (1) – 19 मार्च
  • मुंबई (2) – 20 मार्च
  • पुणे (1) – 20 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
  • पुणे (2) – 21 मार्च
  • मुंबई (8) – 21 मार्च
  • यवतमाळ (1) – 21 मार्च
  • कल्याण (1) – 21 मार्च
  • मुंबई (6) – 22 मार्च
  • पुणे (4) – 22 मार्च
  • मुंबई (14) – 23 मार्च
  • पुणे (1) – 23 मार्च

एकूण – 89 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
  • पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
  • मुंबई – फिलिपिन्सचा 68 वर्षीय नागरिक

एकूण – 7  कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

(Maharashtra Corona Patients Number)

संबंधित बातम्या 

मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर

फिलिपीन्स ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते नवी मुंबई, फिलिपीन्सच्या कोरोना रुग्णाचा धक्कादायक प्रवास

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी