नवी मुंबईत परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपाचार, 3 रुग्णालयांवर कारवाई

वाशीमध्ये नामांकित तीन रुग्णालयांमध्ये परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Corona patients treatment without any permission)

नवी मुंबईत परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपाचार, 3 रुग्णालयांवर कारवाई
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 1:34 PM

नवी मुंबईत : कुठलीही परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशीतील तीन नामांकित रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या या काळ्या कारभाराची मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेत, यातील एका रुग्णालयास 15 दिवस बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा (OPD & IPD) बंद ठेवण्याचे आदेश दिले, तर उर्वरित दोन रुग्णालयांस एक लाखाचा दंड ठोठावला आहे. (Navi Mumbai Corona patients treatment without any permission)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई मनपाने ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेत, ‘ट्रेस, टेस्ट व ट्रिट’ ही त्रिसूत्री राबविण्यावर भर दिला. या अनुषंगाने कोरोना रुग्णांवर लक्षणांनुसार योग्य उपचार व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयांकडून आयसीएमआर (ICMR) तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पण वाशीमध्ये ग्लोबल हेल्थ केअर कुन्नूरे हॉस्पिटल, क्रिटीकेअर सेंटर आणि पामबीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर या तीन रुग्णालयांत विनापरवानगी उपचार सुरू असल्याची बाब समोर आली.

कोरोना संसर्ग आणि रुग्णांची प्रकृती पाहता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या तीनही रुग्णालयांना नोटिशी बजावल्या होत्या. नोटिशीला वेळेत उत्तर न दिल्याने आयुक्तांनी पामबीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर या रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा (OPD & IPD) 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. तर ग्लोबल हेल्थ केअर कुन्नूरे हॉस्पिटल आणि क्रिटी केअर सेंटर या रुग्णालयांका एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

रुग्णालयांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याआधी शासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. तसेच कोव्हिड रुग्णांवर उपचारासाठी आयसीएमआर व महाराष्ट्र शासनाने कार्यप्रणाली निश्चित केलेली असून, त्यानुसारच रुग्णालयांनी उपचार करणे गरचे आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा-1897 ची योग्य अंमलबजावणी करणेही रुग्णालयांस बंधनकारक आहे.

दरम्यान, परवानगी नसताना रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त होतेय. परवानगी नसताना उपचार होत असतील, तर आयसीएमआरच्या गाईडलाईन्सची अंमलबजावनी होत असेल का? असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. तसेच कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ होतोय, असा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

संबधित बातम्या :

मुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार

Raj Thackeray | मुंबईच्या डबेवाल्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली

Corona Update | मुंबईत 60% को मुंबई कोरोनामुक्त होण्यासाठी नेमके किती दिवस लागतील?

रोना मृत्यू झोपडपट्ट्यातील तर मुंबई कोरोना रुग्णांना बेड मिळना

(Navi Mumbai Corona patients treatment without any permission)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.