मुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार

मुंबईतील केईएम रुग्णालयात कोरोना लस कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरु झाले आहे (Corona Vaccine human trial).

मुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार

मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयात कोरोना लस कोव्हिडशील्डचे मानवी परीक्षण सुरु झाले आहे (Corona Vaccine human trial). शनिवारी तीन लोकांवर लसीचे परीक्षण केले जाणार आहे, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी सांगितले. लसीच्या परीक्षणाची प्रक्रिया सुरु झाली आहे (Corona Vaccine human trial).

“आम्ही आतापर्यंत 13 लोकांवर स्क्रीनिंग केली आहे. यामध्ये 10 लोकांची स्क्रीनिंग पूर्ण झाली आहे”, असं रुग्णालयाच्या डीन देशमुख यांनी सांगितले.

पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटिश स्वीडिश फार्मा कंपनी Astra Zeneca सोबत कोव्हिड 19 लस तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे. ही लस ऑक्सफोर्ड यूनिव्हिर्सिटीमध्ये तयार केली आहे.

मानवी परीक्षण प्रक्रियेमध्ये एका इतर व्यक्तीला प्लेसीबो मिळणार. केईएम हे पहिले रुग्णालय आहे. जिथे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मानवी परीक्षण केले जाणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे कोव्हिडशील्ड लस विकसित केली आहे आणि भारतातील पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे.

पीजीआय चंदीगडमध्येही सुरु कोरोना लसीची ट्रायल

पीजीआय चंदीगडमध्येही कोरोना लसीच्या शेवटच्या टप्प्यातील ट्रायल प्रक्रिया सुरु आहे. देशात या लसीच्या ट्रायलसाठी 17 संस्था एकत्र आल्या आहेत. पीजीआयचाही यामध्ये समावेश आहे.

डाटा सेफ्टी अँड मॉनिटरिगं बोर्ड नवी दिल्लीवरुन परवानगी मिळाल्यानंतर पीजीआयमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण प्रक्रिया सुरु झाली आहे. ट्रायलसाठी पीजीआयमध्ये 10 स्वयंसेवकांची निवड केली आहे. सर्वांची तपासणी केली आहे. हे सर्व जण ट्रायलसाठी फिट असल्याचे स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले ‘जम्बो’ कोव्हिड सेंटर ‘कुपोषित’, ICU बेड्सची वानवा, व्हेंटिलेटर्स धूळखात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *