कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एक प्रभावी अँटीबॉडी सापडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे (Scientists have identified highly effective coronavirus antibodies).

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा

मुंबई : कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एक प्रभावी अँटीबॉडी सापडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. जर्मन सेंटर फॉर न्यूरोडीजेनेरेटिव डिसीज (DZNE) आणि चॅरिटी- यूनिवर्सिट्समेडिसिन बर्लिनच्या वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. या अँटीबॉडीच्या मदतीने कोरोनावर मात करणारी प्रभावी लस तयार केली जाऊ शकते, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. ‘जनरल सेल’मध्ये प्रकाशित एका लेखात याबाबत माहिती देण्यात आली आहे (Scientists have identified highly effective coronavirus antibodies).

जर्मन सेंटर फॉर न्यूरोडीजेनेरेटिव डिसीज (DZNE) आणि चॅरिटी- यूनिवर्सिट्समेडिसिन बर्लिनच्या वैज्ञानिकांनी कोरोनावर मात करणाऱ्या जवळपास 600 व्यक्तींच्या रक्तामधील वेगवेगळ्या अँटीबॉडीजचा अभ्यास केला. या अभ्यासात 600 व्यक्तींच्या रक्तातून मिळालेल्या अँटीबॉडीजमधून एक अँटीबॉडी कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी असल्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं.

याआधी भारतीय वंशाचे वैज्ञानिक श्रीराम सुब्रमण्यम यांच्यासह कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया यूनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी SARS-CoV-2 ने संक्रमित उंदरांवर ‘एबी8’ या औषधाचा प्रयोग केला होता. त्यांच्या अभ्यासातून हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर या औषधाचा उपयोग मानवासाठीदेखील होऊ शकतो. या औषधाचा मानवाच्या शरीरावर कोणातही साईड इफेक्ट किंवा नकारात्मक परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला होता (Scientists have identified highly effective coronavirus antibodies).

भारतासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जगभरातील हजारो वैज्ञानिक लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. काही देशांमध्ये लसींची मानवी चाचणीदेखील सुरु आहे. मात्र, कोरोना संक्रमणाचा वेग प्रचंड वेगाने वाढत आहे. यादरम्यान, जर्मन सेंटर फॉर न्यूरोडीजेनेरेटिव डिसीज (DZNE) आणि चॅरिटी- यूनिवर्सिट्समेडिसिन बर्लिनच्या वैज्ञानिकांनी केलेला दावा खरा ठरला तर जगाला मोठा दिलासा मिळू शकतो.

संबंधित बातम्या :

Covid-19 Vaccine | अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात, 60 हजार जणांवर प्रयोग

अमेरिकेत 1 नोव्हेंबरपासून कोरोना लस वाटपासाठी तयारी करा, ट्रम्प सरकारचे राज्यांना सूचना

US Election | कोरोनाच्या लसीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *