माणूस मारुन विचार मारता येत नाहीत : मुक्ता दाभोलकर

मुंबई : विचार मांडले म्हणून हत्या होते, अशा घटना शोभेच्या नाहीत. मुळात माणूस मारुन विचार मारता येत नाही, अशी ठाम भूमिका अंनिसच्या कार्यकर्त्या आणि दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी मांडली. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र महामंथन’ कार्यक्रमात बोलत होत्या. तसेच, आज जे आम्हाला श्रेय मिळतंय, ते आमचं नाही, ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा …

, माणूस मारुन विचार मारता येत नाहीत : मुक्ता दाभोलकर

मुंबई : विचार मांडले म्हणून हत्या होते, अशा घटना शोभेच्या नाहीत. मुळात माणूस मारुन विचार मारता येत नाही, अशी ठाम भूमिका अंनिसच्या कार्यकर्त्या आणि दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी मांडली. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र महामंथन’ कार्यक्रमात बोलत होत्या. तसेच, आज जे आम्हाला श्रेय मिळतंय, ते आमचं नाही, ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा आहे, असेही मुक्ता दाभोलकर यांनी नमूद केले.

महाराष्ट्र आणि भारतात मोकळेपणाने कुठेही बोलू शकत नाही, अशी खंतही मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले. तसेच, लोकशाही असून सुद्धा अभिव्यक्ती स्वतंत्र नाही, असेही मुक्ता दाभोलकर म्हणाल्या.

तुम्ही विचार मांडता म्हणून हत्या होऊ शकते, अशी स्थिती आहे. म्हणून सर्वसामान्य माणूस जास्त घाबरतो आहे. सर्वात आधी माणसाच्या मनात बदल घडायला हवा, तरच समाजात बदल होईल, असेही मत मुक्ता दाभोलकर म्हणाले.

शस्त्र बाळगणे अयोग्य नाही : संजीव पुनाळेकर

राम मंदिर राजकारणाचा विषय नाही, तो श्रद्धेचा विषय आहे. कोणत्याही पक्षाने त्याचं राजकारण करु  नये, असे सनातनचे वकील संजीव पुनाळेकर म्हणाले. तसेच, जे चुकीचं होईल, त्यावर आम्ही टीका करणारच. तो आमचा घटनात्मक अधिकार आहे, असे सांगताना संजीव पुनाळेकर पुढे म्हणाले, शस्त्र बाळगणं अयोग्य नाही, जवानही शस्त्र बाळगतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *