Corona update: गेल्या 24 तासांमध्ये देशात 10,929 नवे कोरोनाबाधित; 392 जणांचा मृत्यू

| Updated on: Nov 06, 2021 | 1:16 PM

देशात गेल्या 24 तासांमध्ये 10,929 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 392 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 12,509 जणांनी कोरोनावर मात केली. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रिकव्हरी रेट 98.23 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Corona update: गेल्या 24 तासांमध्ये देशात 10,929 नवे कोरोनाबाधित; 392 जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांमध्ये 10,929 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 392 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 12,509 जणांनी कोरोनावर मात केली. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रिकव्हरी रेट 98.23 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत देखील घट झाली आहे. आतापर्यंत एकूण 3,37,37,468 जणांनी कोरोनावर मात केली असून देशात सध्या कोरोनाचे  1,46,950 सक्रिय रुग्ण आहेत.

लसीकरणामुळे रुग्णसंख्येत घट 

लसीकरणाचा वेग वाढल्याने कोरोना रुग्ण झपाट्याने कमी होत असल्याचे पहायला मिळत आहेत. आतापर्यंत देशात एकूण 107 कोटी 92 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. मागील 24 तासांमध्ये 20,75,942 लोकांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. लसीकरणामुळे कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. मात्र तरी देखील नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सोशल डिन्स्टसिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा 

देशातील कोरोना स्थिती सुधारत असून, दैनंदिनी पॉझिटिव्ह रेट देखील कमी होत आहे. गेल्या 33 दिवसांमध्ये देशातील पॉझिटिव्ह रेट हा 1.35 टक्क्यांपेक्षाही कमी नोंदवण्यात आला आहे. 33 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण 2 टक्के एवढे होते. देशात कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, मात्र तरी देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांना गंभीर इशारा देण्यात आला आहे. सध्या लसीकरण वाढले आहे, त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र तरी देखील आवश्यक ती सर्व काळजी घेतली जावी, कोरोना नियमांचे पालन न झाल्यास पुन्हा एकदा कोरानाची साथ वाढू शकते. तसेच झाल्यास जगभरातील 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो असा इशारा आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच यूरोप आणि मध्य अशियामध्ये कोरोनीची आणखी एक लाट येऊ शकते असे देखील म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

VIDEO | दिवाळीनिमित्त फटाके आणायला गेला चिमुकला अन् स्फोटात जीव गमावून बसला; वाचा नेमके काय घडले?

पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग; सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला मागे