AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग; सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला मागे

पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे, नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा आज मागे घेतला. 28 सप्टेंबरला पंजाबचे पोलीस महासंचालक, आणि अ‍ॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी या मागणीसाठी त्यांनी आपला राजीनामा दिला होता.

पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग; सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला मागे
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 3:28 PM
Share

चंदीगढ – पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे, नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा आज मागे घेतला. 28 सप्टेंबरला पंजाबचे पोलीस महासंचालक, आणि अ‍ॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी या मागणीसाठी त्यांनी आपला राजीनामा दिला होता. शुक्रवारी त्यांनी राजीनामा मागे घेतला असून, नवे अ‍ॅडव्हकेट जनरल नियुक्त होताच मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार सांभाळेल असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा सिद्धू  यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे. गुरु ग्रथ साहिबचा आपमान आणि ड्रग्स प्रकरणाचा तपास करण्यामध्ये पोलीस महासंचालकांची भूमीका महत्त्वपूर्ण आहे. सध्या पंजाबमध्ये हे दोन मुद्दे कळीचे बनले असून, 2017 मध्ये याच मुद्द्यांवर काँग्रेसला सत्ता मिळाली होती. मात्र तरी देखील तपासात प्रगती न झाल्याने अखेर मुख्यमंत्री बदलण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला.

नव्या मुख्यमंत्र्यांवर टीका 

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिखांचा पवित्र ग्रथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाबमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये गोळीबार झाला होता. गोळीबार प्रकरणी सिद्धू यांनी त्यांच्याच पक्षाचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर आरोप केले होते. नवे मुख्यमंत्री आल्यानंतरही 50 दिवस उलटून देखील गुरु ग्रंथ साहिब अवमान प्रकरणात आणि ड्रग्स प्रकरणात कोणतीही कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच पोलीस महासंचालक आणि अ‍ॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

28 सप्टेंबरला दिला होता राजीनामा 

नवज्योत सिंग सिद्धू यांनी 28 संप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना एक पत्र  लिहीले होते. या पत्रात सिद्धू यांनी म्हटले होते की, मी पंजाबच्या विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करू इच्छित नाही, त्यामुळे मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी जरी राजीनामा दिला असला तरी देखील काँग्रेससाठी यापुढेही काम करतच राहील. मात्र आता सिद्धू यांनी आपला राजीनामा मागे घेतला असल्याने, पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडमोडींना वेग  आला आहे.

संबंधित बातम्या 

CM Bhupesh Baghel : छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी मारून घेतले चाबकाचे फटके, कारण ऐकूण व्हाल थक्क

शेतकऱ्यांचा कृषी कायद्याला विरोध सुरूच, हरयाणात माजी मंत्र्यासह भाजपचे नेते ओलीस, वाहनांची हवाही काढली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.