शेतकऱ्यांचा कृषी कायद्याला विरोध सुरूच, हरयाणात माजी मंत्र्यासह भाजपचे नेते ओलीस, वाहनांची हवाही काढली

कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही थांबलेलं नाही. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. (Farmers protest against BJP leaders: Some BJP leaders held hostage in Rohtak)

शेतकऱ्यांचा कृषी कायद्याला विरोध सुरूच, हरयाणात माजी मंत्र्यासह भाजपचे नेते ओलीस, वाहनांची हवाही काढली
Farmers protest

रोहतक: कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही थांबलेलं नाही. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. हरयाणाच्या रोहतकमध्ये तर कृषी कायद्याला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी थेट भाजप नेत्यांनाच ओलीस धरले आहे. त्यात एका माजी मंत्र्याचाही समावेश असून या सर्वांच्या वाहनातील हवाही शेतकऱ्यांनी काढून घेत आपला निषेध नोंदवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिव मंदिरात मोदींच्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण दाखवण्यात येत आहे. रोहतकच्या किलोई गावातील शिव मंदिरातही लाईव्ह प्रसारण ठेवण्यात आलं होतं. माजी सहकारीता राज्यमंत्री मनीष ग्रोवरसहीत भाजपचे अनेक नेते या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. त्याचवेळी कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या या शेतकऱ्यांनी या भाजप नेत्यांना घेराव घालून त्यांना ओलीस ठेवले. त्यांच्या वाहनातील हवाही काढून घेतली. या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. पोलीसही घटनास्थळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले.

केदारनाथचं लाईव्ह प्रसारण बंद पाडलं

कृषी विधेयकाला विरोध करणारे शेतकरी प्रचंड संतप्त झाले होते. त्यांनी नेत्यांच्या वाहनातील हवा काढून घेतलीच शिवाय मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या टीव्ही स्क्रीनची तारही कापून टाकली. नेत्यांना ओलीस धरल्यानंतर मुख्य दरवाजाच्याबाहेर आंदोलकांनी मोठ मोठे दगडं ठेवली आणि झाडेही ठेवली. गेल्या साडेचार तासापासून भाजप नेत्यांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. पोलीसही गेल्या चार तासांपासून शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या नेत्यांचीही कार्यक्रमाला हजेरी

या कार्यक्रमाला ग्रोवर यांच्याशिवाय भाजपचे संघटन मंत्री रवींद्र राजू, महापौर मनमोहन गोयल. जिल्हा अध्यक्ष अजय बन्सल, सतीश नांदल, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामअवतार बाल्मिकी, उपमहापौर राजकमल सहगल, भाजपचे नगरसेवक, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा उषा शर्मा, भाजपच्या युवा जिल्हा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नवीन ढुल आदी नेते रोहतकला कार्यक्रमाला आले होते.

कृषी कायद्यासाठी आंदोलन सुरूच

गेल्या वर्षी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले होते. मात्र, या कृषी कायद्याचा शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध होत आहे. गेल्या वर्षापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक वेळा चर्चा झाली आहे. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही.

 

संबंधित बातम्या:

Narendra Modi at Kedarnath | पंतप्रधान मोदी केदारनाथाच्या चरणी लीन…..

ईश्वराच्या कृपेनेच केदारनाथचा विकास, नरेंद्र मोदींनी सांगितला ‘शंकर’ शब्दाचा अर्थ

मोदींच्या हस्ते आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण; शंकराचार्यांनी केला होता केदारनाथ मंदिराचा जिर्नोद्धार

(Farmers protest against BJP leaders: Some BJP leaders held hostage in Rohtak)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI