AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईश्वराच्या कृपेनेच केदारनाथचा विकास, नरेंद्र मोदींनी सांगितला ‘शंकर’ शब्दाचा अर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी गुरु शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण केलं. यावेळी त्यांनी शंकर या शब्दाचा अर्थ सांगितला. (Inner Voice Told Me Kedarnath Will be Rebuilt Despite Mass Destruction in 2013, Says PM Narendra Modi)

ईश्वराच्या कृपेनेच केदारनाथचा विकास, नरेंद्र मोदींनी सांगितला 'शंकर' शब्दाचा अर्थ
Narendra Modi
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 11:39 AM
Share

केदारनाथ: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी गुरु शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण केलं. यावेळी त्यांनी शंकर या शब्दाचा अर्थ सांगितला. तसेच ईश्वराच्या कृपेमुळेच मी केदारनाथचा विकास करू शकलो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आज सर्व मठ, 12 ज्योतिर्लिंग, अनेक शिवालय, शक्ती धाम, अनेक तीर्थ क्षेत्रांशी संबंधित महापुरुष, शंकराचार्यांच्या परंपरेशी जोडले गेलेले ऋषी मुनी, श्रद्धाळू सर्वच जण आपल्याला आशीर्वाद देत आहेत. उपनिषदांमध्ये आदि शंकराचार्यांच्या रचनांचा समावेश करण्यात आला असून नेति नेति म्हणून एक भाव विश्व का विस्तार करण्यात आला आहे, असं मोदी म्हणाले.

काही वर्षांपूर्वी केदारनाथचं मोठं नुकसान झालं. ते अकल्पनीय होतं. केदारनाथचं नुकसाना पाहून पुन्हा केदारनाथ उभं राहिल असं कुणाला वाटलं नव्हतं. मात्र, केदारनाथ पुन्हा त्याच वैभवाने उभे राहील असं माझं मन सांगत होतं. आणि झालंही तसंच. केवळ ईश्वराच्या कृपने केदारनाथचं विकास कार्य पूर्ण होऊ शकलं, असंही त्यांनी सांगितलं.

शंकर म्हणजे

यावेळी मोदींनी शंकर या शब्दाचा अर्थ सांगितला. संस्कृतमध्ये शंकर शब्दाचा अर्थ ‘शं करोति सः शंकरः’ असा होतो. म्हणजे जे कल्याण करत आहेत, तेच शंकर आहेत. या व्याख्येला आदी शंकराचार्याने प्रत्यक्षात प्रमाणित केलं आहे. त्यांचं संपूर्ण जीवन जितकं असाधारण होतं, तितकंच ते जनतेसाठी ते समर्पित होते, असं त्यांनी सांगितलं.

ड्रोनवरून नजर

केदारनाथमध्ये महापूर आल्यानंतर पुन्हा एकदा केदारनाथला उभं करणं हे एक आव्हान होतं. त्यासाठी आमचे प्रयत्न होते. दिल्लीतून मी या विकास कामांवर लक्ष ठेवून होतो. ड्रोन फुटेजच्याद्वारे मी या कामांवर ल७ ठेवून होतो, असं त्यांनी सांगितलं.

आदि शंकराचार्यांच्या 12 फूट मूर्तीचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथमध्ये उभारण्यात आलेल्या आदि शंकराचार्यांच्या 12 फूट मूर्तीचे अनावरण करण्यात आले. विषेश म्हणजे मोदीच्या या दौऱ्याचे प्रक्षेपण 12 ज्योतिर्लिंगांसह एकूण 100 ठिकाणी लाईव्ह करण्यात आले होते. केदारनाथ मंदिरातील प्रमुख पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात मोदींनी बाबा केदारनाथची पूजा केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मोदींचा हा सोहळा लाईव्ह पाहिला. केदारनाथ धाम हा चार धामपैकी एक प्रमुख धाम आहे. तसेच केदारनाथच्या मंदिराचा समावेश हा 12 ज्योतिर्लिंगांमध्ये होत असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे. या मंदिरांचा जिर्नोद्धार आदी शंकराचार्यांनी केला होता. सध्याचे केदारनाथ मंदीर हे पांडवकालीन मंदिराच्या शेजारी आहे. पंतप्रधान मोदींनी आज आदी शकंराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण केले.

संबंधित बातम्या:

PM Modi Kedarnath: पंतप्रधानांकडून केदारनाथमध्ये 130 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

Prime Minister Narendra Modi : ‘सैनिक हो, तुम्हीच माझं कुटुंब’ म्हणंत जवानांसोबत साजरी केली ‘दिवाळी’

PM Modi Kedarnath: हे दशक उत्तराखंडचं, 100 वर्षात आले नाहीत एवढे भाविक पुढच्या 10 वर्षात येतील : मोदी

(Inner Voice Told Me Kedarnath Will be Rebuilt Despite Mass Destruction in 2013, Says PM Narendra Modi)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.