AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारला आंदोलनाची धडकी, दिल्लीतील 11 मेट्रो स्टेशन आज बंद, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर ‘आप’कडून मोठे आंदोलन

AAP Protest Against CEC Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आम आदमी पार्टी, डाव्या विचारांचे पक्ष यासह अनेक संघटनांनी घोषणा केली आहे. यामुळे दिल्लीतील 11 मेट्रो स्टेशन आज बंद ठेवण्यात येणार आहे.

सरकारला आंदोलनाची धडकी, दिल्लीतील 11 मेट्रो स्टेशन आज बंद, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर 'आप'कडून मोठे आंदोलन
आज आपचे जंतरमंतरवर मोठे आंदोलन
| Updated on: Oct 02, 2026 | 9:30 AM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. देशातील विविध भागात विरोधकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज मुंबईत सीजेपी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करणार आहे. रविवारी ठाकरे बंधू निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारणार आहेत. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आम आदमी पार्टी, डाव्या विचारांचे पक्ष यासह अनेक संघटनांनी घोषणा केली आहे. यामुळे दिल्लीतील 11 मेट्रो स्टेशन आज बंद ठेवण्यात येणार आहे.

दिल्लीतील 11 मेट्रो स्टेशन आज बंद

दिल्लीतील 11 मेट्रो स्टेशन आज बंद ठेवण्यात आली आहे. जंतर मंतर इथ होणाऱ्या आंदोलनाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हे मेट्रो स्टेशन बंद राहतील अशी घोषणा करण्यात आली आहे. राजीव चौक, मंडी हाऊस, नवी दिल्ली आणि सेंट्रल सेक्रेटरीयेट या स्थानकांवर मार्ग बदलण्याची (Interchange) सुविधा उपलब्ध राहणार आहे.

बंद असलेली मेट्रो स्टेशन 

1. जनपथ

2. पटेल चौक

3. सेंट्रल सेक्रेटरीयेट

4. राजीव चौक

5. सेवा तीर्थ

6. मंडी हाऊस

7. लोक कल्याण मार्ग

8. आयएनए (INA)

9. चावडी बाजार

10. रामकृष्ण आश्रम मार्ग

11. नवी दिल्ली

जंतरमंतरवर मोठ्या आंदोलनाची तयारी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करण्यात येणार आहे. आम आदमी पार्टी, डाव्या विचारांचे पक्ष यासह अनेक संघटनांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सतर्क झाले असून जंतर मंतर परिसरात बॅरिकेटिंग केली आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली जिल्ह्यात BNSS च्या कलम १६३ अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे लेखी परवानगीशिवाय जमावबंदी (पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचे एकत्र येणे), मिरवणुका, निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यास मनाई आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना