AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्रिशूळ, मूर्त्या, टीशर्ट… मोदींना मिळालेल्या वस्तूंचा लिलाव; तुम्हीही खरेदी करू शकता

ई-लिलावातून मिळणारी रक्कम गंगेचे संरक्षण आणि कायाकल्प करण्याच्या उद्देशाने 'नमामि गंगे 'अभियानाला जाईल. "नमामि गंगे" अभियानाद्वारे देशाची जीवनरेषा - गंगा नदीचे संरक्षण करण्याच्या उदात्त कारणासाठीमिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.

त्रिशूळ, मूर्त्या, टीशर्ट... मोदींना मिळालेल्या वस्तूंचा लिलाव; तुम्हीही खरेदी करू शकता
त्रिशूळ, मूर्त्या, टीशर्ट... मोदींना मिळालेल्या वस्तूंचा लिलावImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 12:00 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांना गेल्या काही वर्षात मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मोदींना दिलेल्या अंबाबाईच्या मूर्तीचाही लिलाव होणार आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून लिलावाला सुरुवात होणार आहे. राजधानी नवी दिल्लीतल्या (new delhi) नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये हा लिलाव सोहळा पार पडणार आहे. या लिलावात मोदींना मिळालेल्या एकूण 1200 वस्तू ठेवण्यात येणार आहेत. या लिलावात कोणीही भाग घेऊ शकत असून त्यांना मोदींना मिळालेल्या वस्तू विकत घेता येणार आहेत.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींना राणी कमलापतींची मूर्ती भेट दिली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींना हनुमानाची मूर्ती भेट दिली होती. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी त्यांना त्रिशूळ भेट दिला होता. या सर्व वस्तू या लिलावात ठेवण्यात येणार आहेत.

मेडल विजेत्या खेळाडूंच्या स्वाक्षरीचे टी शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, जॅवलिन आणि रॅकेटसारखे स्पोर्ट्स आयटमही या लिलावात ठेवण्यात येणार आहेत. या लिलावात अयोध्याच्या श्रीराम मंदिर आणि वाराणासीतील काशी विश्वानाथ मंदिराची रिप्लिकाही ठेवण्यात येणार आहे.

त्याशिवाय आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी दिलेली भगवान व्यंकटेश्वरची मूर्ती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्तीही लिलावात ठेवण्यात येणार आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या मूर्तीची बेस प्राईस पाच लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

टोक्यो 2020 पॅरालिम्पिक आणि टोक्यो 2020 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनी पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून दिलेले क्रीडा साहित्य आणि उपकरणांचा या ई- लिलावात समावेश आहे. इतर चित्तवेधक कलाकृतींमध्ये अयोध्या राममंदिर, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरची प्रतिकृती शिल्प, चित्रे, वस्त्रे आदींचा समावेश आहे.

ई-लिलावाच्या या फेरीत सुमारे 1330 स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव केला जात आहे. टोक्यो 2020 पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल यांनी वापरलेला भाला आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक गेम्समध्ये नीरज चोप्रा यांनी वापरलेला भाला हा सर्वात जास्त किंमत असलेली वस्तू आहे. या भाल्यांची कमीत कमी अपेक्षित किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. रु. 200 किंमतीचा लहान आकाराचा सजावटीचा हत्ती हा सर्वात कमी किंमत असलेली वस्तू आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी एका ट्विटद्वारे लिलावासंदर्भात माहिती दिली आहे.

ई-लिलावातून मिळणारी रक्कम गंगेचे संरक्षण आणि कायाकल्प करण्याच्या उद्देशाने ‘नमामि गंगे ‘अभियानाला जाईल. “नमामि गंगे” अभियानाद्वारे देशाची जीवनरेषा – गंगा नदीचे संरक्षण करण्याच्या उदात्त कारणासाठीमिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. उत्तराखंडमधील गौमुख येथे नदीच्या उगमस्थानापासून ते पश्चिम बंगालच्या समुद्रामध्ये विलीन होणाऱ्या या सामर्थ्यशाली नदीने देशातील अर्ध्या लोकसंख्येचे जीवन समृद्ध केले आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी अनेकदा गंगा नदीचे वर्णन देशाच्या सांस्कृतिक गौरवाचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून केले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.