
लग्नासाठी मुलगी मिळत नाही, त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील तरुणांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये निराशेचं वातावरण आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये फक्त 11 मुलींचे लग्न करण्यासाठी 10-20 नाही तर 1900 मुलांची मुलाखत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यातून 11 मुलांची निवड करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये 11 मुलींचे लग्न करण्यासाठी 1900 मुलांचे अर्ज आले होते, त्यांची मुलाखत घेण्यात आली. नंतर त्यांची पार्श्वभूमी तपासण्यात आली, त्यानंतर कुटुंबाची पडताळणी करण्यात आली. सॅलरी स्लिपदेखील तपासण्यात आली. सर्व अटी पूर्ण झाल्यानंतर पात्र मुलांसोबत मुलींचे लग्न आनंदाने लावून देण्यात आले.
राजस्थान राज्य सरकार आणि महिला सदनच्या पुढाकाराने राज्यातील उपेक्षित, पीडित आणि असहाय्य मुलींचे आयुष्य सुधारण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लग्नासाठी राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांतील मुलांनी अर्ज केले होते. जयपूर, दिडवाना, झुंझुनू, कोटा आणि बारान या जिल्ह्यांतील 1900 मुलांचा यात समावेश होता.
सर्वांची मुलाखत
मुलांचे अर्ज आल्यानंतर मुलाखती झाल्या, त्यानंतर कुटुंबियांचा शोध घेण्यात आलाय त्यांच्याबाबत शेजाऱ्यांकडून अभिप्राय घेण्यात आला. या मुलांच्या उत्पन्नाचे स्रोत देखील तपासले आणि त्यानंतर या 11 मुलींसाठी 11 नवरदेव निवडण्यात आलेव त्यांचे लग्न लावण्यात आले.
जयपूरमधील सर्वाधिक 6 नवरदेव
वरांच्या निवडीदरम्यान मुलांचे चारित्र्यदेखील तपासण्यात आले. 1900 अर्जांपैकी जयपूरमधून सर्वाधिक म्हणजे 6 जणांची निवड करण्यात आली आहे. तसेच दिडवाना-कुचामनमधून 2, झुंझुनू, कोटा आणि बारानमधून प्रत्येकी एका वराची जणांची निवड करण्यात आली.
‘जीवन पुनर्वसन’
सामाजिकदृष्ट्या पीडित आणि दुर्लक्षित मुलींना नवीन जीवन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. या मुलींच्या जीवनातील दुःख दूर व्हावे आणि त्यांचे जीवन आनंदाने भरले जावे हा या मागील उद्देश होता, राज्य सरकारने या कार्यक्रमाला ‘जीवन पुनर्वसन’ असे नाव दिले आहे.