हे राम! राम मंदिराच्या भूखंडाचे श्रीखंड, अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी; देशभर खळबळ

अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. (Ram Temple Trust)

हे राम! राम मंदिराच्या भूखंडाचे श्रीखंड, अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी; देशभर खळबळ
आयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मच चित्र
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 10:39 AM

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्याने देशभर एकच खळबळ उडाली असून ट्रस्टच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. (2 Crores To 18 Crores In Minutes; Ram Temple Trust Accused Of Land Scam)

उत्तर प्रदेशात पुढच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा हा घोटाळा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जो भूखंड 2 कोटींचा आहे. तो अवघ्या दहा मिनिटात 18 कोटींचा करण्याची किमया ट्रस्टने साधल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केवळ दहा मिनिटात ट्रस्टने भूखंडाची किंमत कोट्यवधी कशी केली हा प्रश्न विचारला जात आहे. तसेच ट्रस्टने एवढ्या महागड्या भावात भूखंड का खरेदी केला? कशासाठी केला? हा व्यवहार कधी झाला आणि त्याला मंजुरी मिळाली तरी कशी? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

आपकडून घोटाळा उघड

आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी कागदपत्रांच्या हवाल्याने हा आरोप केला आहे. सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे. केवळ आपच नव्हे तर माजी मंत्री पवन पांडेय यांनीही या घोटाळ्याचा आरोप केला आहे.

 

आरोप नाकारले

दरम्यान, ट्रस्टने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रस्टचे महासचिव आणि विहिंपचे नेते चंपत राय आंनी अधिकृत पत्र जारी करून हे आरोप फेटाळून लावले आहेत. वास्तूनुसार मंदिर परिसराच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला परिसराच्या सुरक्षेसाठी काही छोटेमोठे मंदिर आणि निवासस्थाने बनविण्याची गरज होती. ज्यांच्याकडून घरे खरेदी केली जाणार आहेत. त्यांना पुनर्वसनासाठी जमीन दिली जाणार आहे. त्यासाठी भूखंड खरेदी केला जात आहे. आम्ही खरेदी केलेला भूखंड बाजार भावानेच खरेदी केला आहे. मात्र राजकीय लोक द्वेषाने प्रेरित होऊन संभ्रम निर्माण करत आहेत, असं चंपत राय यांनी म्हटलं आहे. (2 Crores To 18 Crores In Minutes; Ram Temple Trust Accused Of Land Scam)

 

संबंधित बातम्या:

चिराग पासवान यांना मोठा धक्का, काकासह पाच खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

पंजाबमध्ये बसपा-अकाली दलाच्या आघाडीचं राजकीय गणित काय?; कुणाला बसणार धक्का, वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशमध्ये ‘कोरोना माते’चं मंदिर, जयजयकार करत प्रसाद ठेऊन प्रकोप कमी करण्यासाठी लोकांच्या रांगा

(2 Crores To 18 Crores In Minutes; Ram Temple Trust Accused Of Land Scam)