धक्कादायक… एक क्लिक आणि 200 सामन्य रुग्ण टीबी संक्रमित घोषित… काय आहे प्रकरण?
रुग्णालयात असं काय घडलं...? एका क्लिकमुळे 200 सामान्य रुग्ण टीबी रुग्ण संक्रमित घोषित... कुठे आणि कशी घडली धक्कादायक घटना..., नागरिकांच्या मनात भीती... काय म्हणाले डॉक्टर?

डेटा एन्ट्री करताना एक चूक झाली आणि 200 सामान्य रुग्णांनी टीबी रुग्ण घोषित करण्यात आलं. ज्यामुळे रुग्णालयाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. संबंधित घटना कुठे आणि कशी घडली आहे… याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारी पोर्टलवर डेटा एंट्री करताना झालेल्या मानवी चुकीमुळे 200 सामान्य रुग्णांना टीबीची लागण झाल्याचं घोषित करण्यात आलं. सीएमओ कार्यालयात एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. या चुकीमुळे केवळ रुग्णांमध्येच नाही तर त्यांच्या कुटुंबियांमध्येही भीती, तणाव आणि गोंधळ निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सीएमओ कार्यालयात तैनात असलेल्या एका क्लर्कने टीबी नियंत्रण कार्यक्रमासंबंधित एका पोर्टलवर रुग्णांचा डेटा अपलोड केला. अशात एका चुकीच्या क्लिकमुळे तब्बल 200 रुग्णांना टीबी ग्रस्त रुग्ण घोषित करण्यात आलं. ज्यांनी कधी टीबीची तक्रार देखील केली नव्हती. सरकारी रिकॉर्डमध्ये टीबी म्हणून घोषित झाल्यानंतर रुग्णांना देखील मोठा धक्का बसला… आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने चुकीच्या नोंदी असूनही, कोणत्याही स्तरावर वेळेवर पडताळणी झाली नाही.
कसा झाला खुलासा?
एका व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग दरम्यान जिल्ह्याचील टीबी संक्रमितांची संख्या घोषित करण्यात आली… तेव्हा प्रकरण उघडकीस आलं… संख्येत वाढ दिसून आल्यानंतर रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं. तपासणीत असं आढळून आलं, की टीबी पोर्टलवर सुमारे साडेचार लाख रुग्णांचा डेटा अपलोड करण्यात आला होता, त्या दरम्यान 200 सामान्य रुग्णांची चुकून टीबी बाधित म्हणून नोंदणी करण्यात आली होती.
सीएमओ डॉक्टर केके अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपलोड करण्यात आलेला डेटा एक मानवी चूक आहे… तात्काळ तपासणी करत सर्व 200 रुग्णांच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली आणि पोर्टलवर चुकीच्या पद्धतीने नोंदवलेल्या टीबी-पॉझिटिव्ह नावांची दुरुस्ती केली जात आहे. रुग्णांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केलं.
कडक देखरेखीची गरज
या घटनेमुळे आरोग्य विभागाचे निष्काळजी कामकाज उघडकीस आलं आणि भविष्यात अशा गंभीर चुका टाळण्यासाठी कडक देखरेख आणि पडताळणी यंत्रणेची गरज अधोरेखित होत आहे… हे प्रकरण केवळ तांत्रिक चुकीपुरते मर्यादित नव्हते, तर त्याचा रुग्णांच्या मानसिक आणि सामाजिक स्थितीवर मोठा परिणाम झाला.
