AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 predictions astrology : चेंगराचेंगरी, विमान अपघात आणि… ज्योतिषांच्या नजरेत 2025 वर्ष का आहे खतरनाक? काय काय घडणार?

2025 हे वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत धोकादायक मानले जात आहे. शनि, गुरु, राहू आणि केतू या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक अशुभ योग निर्माण झाले आहेत. या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत भारतात मोठ्या प्रमाणात दुर्घटना, आपत्ती आणि अशांती पाहिली गेली आहे. हे ग्रह परिवर्तन आणि ग्रहणांशी जोडले गेले आहे. ज्योतिषी या वर्षाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

2025 predictions astrology : चेंगराचेंगरी, विमान अपघात आणि... ज्योतिषांच्या नजरेत 2025 वर्ष का आहे खतरनाक? काय काय घडणार?
2025 वर्ष सर्वात खतरनाक का? काय काय घडणार?Image Credit source: social media
| Updated on: Jun 23, 2025 | 12:41 PM
Share

2025 predictions astrology : 2025 या वर्षाबद्दल विविध भाकीतं सोशल मीडियावर सुरू आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून तर 2025 आणि 2026 ही दोन वर्षं सर्वात धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. कारण या काळात शनि, गुरु, राहू आणि केतूमध्ये मोठे परिवर्तन होणार आहे. 2019 सालापासून देशात आणि जगात वेगाने बदल होत आहेत. कोरोना महामारीनंतर तर जग पूर्णपणे बदलले आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध झालं. इस्रायलनेही इराणवर हल्ला केला. जगातला तणाव वाढला आहे. सगळीकडेच अस्थिरतेचं वातावरण आहे.

2025 बद्दलची सर्व भाकितं सध्या व्हायरल होत आहेत. 2025 हे विनाशाचे वर्ष असेल असं प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांनी त्यांच्या भाकितांमध्ये म्हटलं होतं. तर भारतीय ज्योतिषी देखील या वर्षाला धोकादायक म्हणत आहेत. कारण या वर्षी अनेक ग्रहांमध्ये मोठे परिवर्तन होणार आहे. यामुळे जगात खूप उलथापालथ होऊ शकते. 2025 चा अर्धा भाग झालाय, आत्ताशी जून महीना संपत आलाय तरी जगभरात आणि भारतातही काय काय घडलंय, ते पाहून लोक हैराणच झालेत. 2025 हे वर्ष धोकादायक ठरेल असे भाकीत ज्योतिषींनीकेले होते. जवळजवळ अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. या वर्षी 4 मोठ्या ग्रहांनी त्यांच्या राशी बदलल्या आणि त्यासोबतच 15 दिवसांच्या अंतराने होणाऱ्या सूर्य आणि चंद्रग्रहणांच्या संयोगामुळे देश आणि जगाची परिस्थिती बदलली.

14 मार्च रोजी पूर्ण चंद्रग्रहण होते. मीन संक्रांती त्याच दिवशी होती. 29 मार्च 2025 रोजी शनीने मीन राशीत प्रवेश केला. त्याच दिवशी सूर्यग्रहण झाले. 14 मे 2025 पासून, गुरू वृषभ राशीतून बाहेर पडला आणि तीनदा मिथुन राशीत प्रवेश केला. 18 में 2025 रोजी राहूने गुरूच्या मीन राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश केला आणि त्याच दिवशी केतू सिंह राशीत घुसला. या ग्रहसंयोगासोबतच शनि मंगळ नवपंचम योग, पिशाच योग, कुंज केतू योग, षडाष्टक योग, खप्पर योग असे अनेक अशुभ योग देखील तयार झाले. या सर्वांमुळे, देश आणि जगाने घटना, अपघात, आग, भूकंप, नैसर्गिक आपत्ती तसेच सार्वजनिक उठाव आणि युद्धाची भीषणता पाहिली. जानेवारी ते जून या 6 महिन्यांत भारतात 6 मोठ्या दुर्दैवी घटना घडल्या. हे सर्व ग्रहण आणि ग्रह बदलांच्या आसपास 15 ते 20 दिवसांच्या अंतराने घडले आहेत.

गेल्या 6 महिन्यांत काय घडलं ?

1. महाकुंभ चेंगराचेंगरी :

प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी २०२५ या कालावधीत झालेल्या कुंभमेळ्यात 66 कोटी लोकांनी स्नान केले. यादरम्यान, 29 जानेवारी, बुधवार रोजी मौनी अमावस्येच्या निमित्ताने महाकुंभात संगम किनाऱ्याजवळ चेंगराचेंगरी झाली. संगमनोज येथे स्नान करणाऱ्यांची मोठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये ब्रह्मबेलाच्या प्रतीक्षेत असलेल्या 37 भाविकांना आपला जीव गमवावा लागला, तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

2. दिल्ली चेंगराचेंगरी :

यानंतर, 15 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9 वाजून 26 मिनिटांनी, दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत कुंभमेळ्याला जाणाऱ्या 18 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 14 महिला आणि 3 मुलांचा समावेश होता. दरम्यान, प्रयाग महाकुंभ मेळ्याला यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एसयूव्हीची प्रयागराजमध्ये बसशी टक्कर झाली, ज्यामुळे एसयूव्हीमधील सर्व 10 जणांचा मृत्यू झाला.

3. गुजरातच्या डीसामध्ये आग :

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली आणि त्यात 17 कामगारांचा मृत्यू झाला. ही आगीची घटना 1 एप्रिल 2025 रोजी घडली.

4. पहलगाम दहशतवादी हल्ला :

फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवणारा पहलगामचा दहशतवादी हल्ला 22 एप्रिल 2025 रोजी झाला. काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारून गोळ्या घालून ठार मारले. दहशतवाद्यांनी प्रामुख्याने हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले. मात्र त्यामध्ये इंदूरमधील एका ख्रिश्चन पर्यटकाचाही यात सहभाग होता आणि लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करताना एका स्थानिक मुस्लिम नागरिकाचीयात मृत्यू झाला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत शेकडो दहशतवाद्यांना ठार केलं.

5. आयपीएल जिंकल्यानंतर आरसीबीच्या रॅलीमध्ये चेंगराचेगरी :

बुधवार, 4 जून 205 रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या विजयी रॅलीनंतर जल्लोषापूर्वी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेंगराचेंगरीत 47 जण जखमी झाले.

6. अहमदाबाद विमान अपघात :

तर अहमदाबादमध्ये घडलेल्या सर्वात मोठ्या विमान अपघाताने संपूर्ण देशास जगालाही हादरवून टाकलं. 12 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी वाजता घडला. विमानात असलेल्या 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला तर विमान कोसळलेल्या ठिकाणाभोवती असलेल्या लोकांसह एकूण मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे.यात फक्त एकमेव प्रवासी वाचला.

दरम्यान 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पाचोरा जवळ खोट्या फायर अलार्ममुळे एका प्रवासी ट्रेनची दुसऱ्या ट्रेनमधून उतरणाऱ्या लोकांच्या गटाशी टक्कर झाल्याने तेरा जणांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले. तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यानही एक दुर्घटना घडली. गर्दीमुळे लोकल ट्रेनच्या दारावरून 10 प्रवासी पडले. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.