
Gold Robbery : कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण परिसरातील एसबीआयच्या शाखेवर दरोडा पडला. 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी जवळपास 6.30 वाजता तीन चोर बँकेत शिरले. त्यांनी तोंडला रुमाल लावलेले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. जवळपास 1 कोटी रोख आणि 20 किलोच्या जवळपास सोने घेऊन फरार झाले. पोलिसांनी त्यांचा खूप शोध घेतला. पण ते सापडले नाहीत. पण मग असे काही घडले की चमत्काराच म्हणावा लागेल. काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार घडला.
20 किलो सोन्याची किंमत बाजारात 20 कोटी रुपयांहून अधिक होती. म्हणजे रोखीसह 21 कोटींची लूट झाली होती. 6 सप्टेंबरपासून पोलीस चोराचा शोध घेत होते. पण त्यांचा कुठंच काही थांगपत्ता लागत नसल्याने बँक कर्मचारी आणि पोलिसांचाही जीव टांगणीला लागला होता. पण या प्रकरणात खरे वळण आले ते 21 सप्टेंबर रोजी. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील हुलजांटी गावात या व्यक्तीच्या व्हॅनला किरकोळ अपघात झाला. त्यामुळे लोकांची एकच गर्दी झाली. पण त्याचवेळी चालकाने अचानक पिस्तूल काढली नि तो लोकांना धमकावून पळाला.
833 ग्रॅम सोने सापडले
पण तो व्हॅन तिथेच सोडून गेला. पोलिसांनी हे वृत्त समजताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी या व्हॅनमधून सोन्याची 21 पॅकेट ताब्यात घेतली. त्यात जवळपास 833 ग्रॅम सोने होते. त्याचवेळी या व्हॅनमधून एक लाख रुपयांहून अधिकची रक्कम पकडली. पण पुढे असे काही घडलं की सर्व सोनं आणि रोख रक्कम आपणहून पोलिसांकडे आली. पोलिसांनी पुढे मोठे कष्ट करावे लागलेच नाही.
पोलिस व्हॅन मालकाचा शोध घेत होते. त्यांना दोन दिवसांनी मोठे यश मिलाले. एका बंद घरात पोलिसांना एक बॅग मिळाली. त्यात 6.54 किलो सोने आणि जवळपास 41 लाख रुपये रोकड होती. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 1.5 किलो सोने आणि 44.25 लाख रुपये जप्त केले.
सर्वच आरोपींना अटक
पोलिसांना साखळी जुळवण्यात यश आले. त्याचवेळी गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती सातत्याने या बँकेच्या आसपास फिरल्याचे पोलिसांच्या नंतर लक्षात आले. हा आरोपी महाराष्ट्राचा होता. तोच या कटाचा मास्टरमांईड होता. त्यानेच सोलापूर येथून कार चोरून हा दरोडा घडवून आणाला होता. 7 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. तर राकेश कुमार साहनी, राजकुमार पासवान आणि रक्षक कुमार या तिघांना पोलिसांनी बिहारमधील समस्तीपूर येथून अटक केली.