स्टेशनवर नोटांचा ढीग! पाचशेच्या नोटांचे 280 बंडल जप्त, प्रवाशाच्या बॅगेतील 1.40 कोटी रुपये नेमके कोणाचे?

खडगपूर रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी एका प्रवाशाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बॅगेतून 1 कोटी 40 लाख रुपयांची रोकड सापडली. पाचशेच्या नोटांचे तब्बल 280 बंडल पाहून पोलीसही चक्रावले. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

स्टेशनवर नोटांचा ढीग! पाचशेच्या नोटांचे 280 बंडल जप्त, प्रवाशाच्या बॅगेतील 1.40 कोटी रुपये नेमके कोणाचे?
Kharagpur railway station cash seizure
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 4:56 PM

रेल्वे स्टेशनवरील नेहमीची गर्दी, प्लॅटफॉर्मवर गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी आणि धावपळ… पण याच गर्दीत एका प्रवाशाची संशयास्पद हालचाल पोलिसांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. पश्चिम बंगालमधील खडगपूर रेल्वे स्टेशनवर सरकारी रेल्वे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल १ कोटी ४० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ५०० रुपयांच्या नोटांचे एक-दोन नव्हे तर तब्बल २८० बंडल एकाच प्रवाशाच्या बॅगेत सापडल्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

संशयास्पद हालचालींमुळे फुटले बिंग

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल सोनी (३६) असे या संशयित प्रवाशाचे नाव असून तो हावडा येथील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी तो टाटानगरहून हावड्याच्या दिशेने प्रवास करण्यासाठी खडगपूर स्टेशनवर पोहोचला होता. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर तो तब्बल तीन मोठ्या बॅगा घेऊन उभा होता. यादरम्यान गस्तीवर असलेल्या जीआरपी पोलिसांची नजर त्याच्यावर पडली. राहुलच्या हालचाली अतिशय संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला हटकले. मात्र, पोलिसांना पाहताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला जागीच जेरबंद केले.

Loading...

मशीन मागवून मोजावे लागले पैसे

पोलिसांनी जेव्हा राहुलच्या ता बॅगांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बॅगेत ५०० रुपयांच्या नोटांचे भलमोठे गठ्ठे रचलेले होते. तातडीने मोजणी करण्यासाठी बँक अधिकारी व मशीन मागवण्यात आले. मोजणी पूर्ण झाल्यानंतर समोर आलेला आकडा तब्बल १ कोटी ४० लाख रुपये इतका होता. पोलिसांनी तात्काळ ही संपूर्ण रोकड जप्त केली आणि राहुलला ताब्यात घेतले.

१.४० कोटी रुपये नेमके कोणाचे?

पोलिसांच्या चौकशीत राहुलने आपण ही रोकड टाटानगरहून हावडा येथे घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती दिली. मात्र, एवढी अवाढव्य रक्कम त्याच्याकडे कशी आली? या पैशांचा नेमका स्रोत काय? आणि ती कोणाला पोहोचवली जाणार होती? या प्रश्नांची कोणतीही समाधानकारक माहिती तो देऊ शकला नाही.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने आयकर विभागाला या घटनेची माहिती दिली आहे. रेल्वेमार्गे एवढी मोठी रोकड बेकायदेशीरपणे नेण्यामागे नेमके काय कारस्थान आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सामील आहे, याचा कसून शोध सध्या पोलीस आणि आयकर विभाग घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us