वाढत्या तापमानाने होरपळणार भारतातील ६० कोटी लोकं, वैज्ञानिकांच्या अभ्यासात खळबळजनक खुलासा

तापमान वाढीमुळे लू, चक्रिवादळ, पूर अशा संकटांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जागतिक स्तरावरील समुद्रातील पाण्यामध्ये वाढ होईल.

वाढत्या तापमानाने होरपळणार भारतातील ६० कोटी लोकं, वैज्ञानिकांच्या अभ्यासात खळबळजनक खुलासा
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 4:24 AM

नवी दिल्ली : वाढत्या तापमानावर नवे अध्ययन समोर आलंय. जगात वाढत्या तापमानामुळे इशारा देण्यात आला आहे. जगात जास्त लोकसंख्येच्या देशांना याचा जास्त फटका बसणार आहे. भारतात वाढत्या तापमानामुळे सुमारे ६० कोटी लोकांना फटका बसणार आहे. जग वातावरणातील बदलामुळे झुंज देत आहे. तरीही ग्लोबल वार्मिंगचे संकट काही टळताना दिसत  नाही. वैज्ञानिकांच्या मते २०८०-२१०० पर्यंत पृथ्वीवरील तापमानात २.७ डिग्री सेल्सिअसची वाढ होईल. याचा पावसावर मोठा परिणाम पडणार आहे. तापमान वाढीमुळे लू, चक्रिवादळ, पूर अशा संकटांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जागतिक स्तरावरील समुद्रातील पाण्यामध्ये वाढ होईल. बर्फ वितळून समुद्राच्या पाण्यात येईल.

भारतातील अर्ध्या लोकसंख्येवर होणार परिणाम

संशोधनात ही बाब समोर आली की, २.७ डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ होणार आहे. याचा परिणाम भारतातील अर्ध्या लोकसंख्येवर होणार आहे. हे संशोधन जर्नल नेचर सस्टेनेबिलीटीमध्ये प्रकाशित झालंय. हे अध्ययन एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल सिस्टम इंस्टिट्यूटच्या अर्थ कमिशन आणि नानजिंग युनिव्हर्सिटीने केलंय. भारतापाठोपाठ भीषण गर्मीचा सामना हा नायजेरीया देशाला करावा लागणार आहे. नायजेरीयातील ३० कोटी लोकं या गर्मीचा सामना करतील.

हे सुद्धा वाचा

सहा कोटी लोकं करतात लूचा सामना

तापमान वृद्धी ही १.५ डिग्री सेल्सिअस झाल्यास ९ कोटी लोकांना वाढत्या तापमानाचा फटका बसेल. जागतिक स्तरावर एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढले आहे. समजा ग्लोबल स्तरावर तापमान ३.६ डिग्री सेल्सिअस वाढली तर ४.४ डिग्री सेल्सीअस तापमानात वाढ वाढ होईल. अशावेळी जगातील अर्ध्या लोकांना तापमान वाढीचा फटका बसेल.

सध्या उन्हाळा सुरू असल्याने तापमान वाढीचे चटके बसायला लागले आहेत. शहरात सिमेंटचे रस्ते असल्याने तापमानात वाढ होते. कंपन्या असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूर निघतो. याचाही परिणाम तापमान वाढीवर होते. जागतिक तापमान वाढ होण्याचा धोका आहे. असे झाल्यास याची झळ बहुतेक लोकांना सोसावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.