Explainer : हुंडाबळी : कायदा येऊन ६५ वर्षे झाली, तरी दिवसाला जातात २० विवाहितांचे बळी, काय नेमके कारण ?

हुंडाबळी प्रकरणात एखादे हायप्रोफाईल प्रकरण आले की प्रसारमाध्यमांतून ते उचलले जाते. काही वेळ चर्चा होते. पुन्हा सर्व शांत होते. देशात हुंडाबळी प्रतिबंधक कायदा येऊन ६५ वर्षे झाली तरी हुंडाबळीची प्रकरणे थांबलेली नाहीत. काय आहे या मागची कारणे पाहूयात...

Explainer : हुंडाबळी : कायदा येऊन ६५ वर्षे झाली, तरी दिवसाला जातात २० विवाहितांचे बळी, काय नेमके कारण ?
Dowry Act Twisha sharma to Vaishnavi
| Updated on: May 25, 2026 | 5:41 PM

मॉडेल आणि अभिनेत्री तसेच मिस पुणे – २०१२ असलेल्या ट्वीशा शर्मा हीचा भोपाळ येथे १२ मे रोजी झालेल्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हुंडा बळीचा विषय  चर्चेला आला आहे. हुंडाबळीमुळे दरवर्षी भारतात हजारो तरुण महिलांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा त्यांची हत्या केली जाते. भोपाळच्या ट्विशा शर्मा हीच्या संशयास्पद मृत्यूनंतर १७ मे रोजी नोएडा येथील दीपिका नागर हिच्या आत्महत्येने प्रसारमाध्यमात हाच विषय चर्चिला जात आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही हुंडाबळींची संख्या जास्त आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिच्या निधनानंतरही ( मे २०२५ ) महाराष्ट्रातही वर्तमान पत्रे, बातम्यात हुंडाबळी विषयी चर्चा झडली होती. महाराष्ट्रात रोज सरकारी १५ ते २० तरुणींचा हुंड्यातून बळी जात असतो. हुंडाबळी प्रतिबंधक कायदा १९६१ रोजी पास झाला होता. या घटनेला ६५ वर्षे झाली तरी हुंडाबळीचे प्रमाण काही कमी झालेले नाही. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us