2 वर्षांच्या भावाचा मृतदेह 2 तास हातात घेऊन बसला 8 वर्षांचा चिमुरडा, एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी पित्याची धावाधाव

| Updated on: Jul 10, 2022 | 10:41 PM

पूजाराम यांची आर्थि स्थिती नाजूक असल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. मुलाच्या मृत्यूने दुखी असलेल्या पूजाराम यांना व्यवस्थेनेही त्याच अवस्थेत सोडले. अशा वेळी मोठ्या मुलाच्या हातात लहान भावाचा मृतदेह देऊन वाहन शोधण्याची वेळ पूजाराम यांच्यावर आली.

2 वर्षांच्या भावाचा मृतदेह 2 तास हातात घेऊन बसला 8 वर्षांचा चिमुरडा, एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी पित्याची धावाधाव
धक्कादायक
Image Credit source: social media
Follow us on

मुरैना – मध्यप्रदेशात (Madhya Pradesh)ह्रद्य पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मुरैनात 8 वर्षांचा लहानसा मुलगा आपल्या दोन वर्षांच्या भावाचा (2 years brother) मृतदेह (dead body)हातात घेऊन दोन तास एकटाच बसून होता. या दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी या दोन्ही मुलांचा पिता वाहनाच्या शोधात इकडे-तिकडे फिरत असताना हा प्रकार सुमारे दोन तास सुरु होता. मात्र एकानेही या पीडित कुटुंबाला मदत केली नाही. माणुसकीला काळिमा फासणारी घटना असाच याचा उल्लेख करावा लागेल. मुरैनाच्या जिल्हा रुग्णालयात हा सगळा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं

अंबाह गावातील रहिवासी पूजाराम आपल्या दोन वर्षांचा मुलगा राजा याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला घेऊन जिल्हा रुग्णालयात आले होते. राजाच्या पोटात दुखत होतं, आणि तो वेदनेने तडफडत होता. पूजाराम आपल्या आठ वर्षांचा मुलगा गुलशन यालाही सोबत घेऊन आले होते. उपचारादरम्यान दोन वर्षीय राजाचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

मुलाचे अत्यंविधी गावी करण्याची बापाची होती इच्छा

आपल्या मुलावर अंत्य संस्कार गावी व्हावेत अशी या पूजाराम यांची इच्छा होती. त्यासाठी राजाचा मृतदेह गावी कसा घेऊन जायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. गावी हा मृतदेह नेण्यासाठी एम्ब्युलन्सच्या शोधात ते फिरत राहिले. पूजाराम यांची आर्थि स्थिती नाजूक असल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. मुलाच्या मृत्यूने दुखी असलेल्या पूजाराम यांना व्यवस्थेनेही त्याच अवस्थेत सोडले. अशा वेळी मोठ्या मुलाच्या हातात लहान भावाचा मृतदेह देऊन वाहन शोधण्याची वेळ पूजाराम यांच्यावर आली.

एम्ब्युलन्ससाठी हवे होते दीड हजार रुपये

आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह गावी घेऊन जण्यासाठी दीड हजारांची गरज पूजाराम यांना होती. तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी व्यवस्थेकडे मदत मागितली. सरकारी एम्ब्युलन्ससाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना मदत मिळाली नाही. त्यानंतर खाजगी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठीही प्रयत्न केले, मात्र तीही मिळाली नाही. अशा वेळी कमी पैशात एम्ब्युलन्सच्या शोधात पूजाराम यांना फिरावे लागले. अशा स्थितीत त्यांनी दोन वर्षांच्या राजाचा मृतदेह आठ वर्षांच्या बालकाच्या हातात दिला. दोन तीन तासांच्या अवधीनंतर ही माहिती पोलिसांना कळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला आणि त्यानंतर एम्ब्युलन्सची व्यवसल्था करत हा मृतदेह त्याच्या गावी पाठवला.