
आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, त्यामुळे कदाचित तुम्हाला राग देखील येऊ शकतो. तुम्ही म्हणाल असं कधी कोणी करतं का? मात्र असे अनेक प्रकार देखील समोर आले आहेत. आज आम्ही तुम्हाला ट्रेनमधील एका खास गोष्टीबद्दल माहिती सांगणार आहोत, ट्रेनमधून प्रवास करायला सर्वांनाच आवडतो. प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार ट्रेनचं तिकीट काढतो. कोणी जनरल डब्याचं तिकिट काढतो, कोणी थर्ड एसी, कोणी सेकंड एसी तर कोणी फस्ट एसी.
जनरल डबा आणि स्लिपर क्लास वगळता रेल्वेच्या इतर डब्यामध्ये तुम्हाला झोपण्यासाठी खास प्रकारची चादर, बेडशीट आणि लोड तसेच टॉवेल देखील पुरवले जातात. या सर्व वस्तू प्रवाशांच्या सुविधेसाठी असतात. यावर रेल्वे विभाग लाखो रुपये खर्च करते. मात्र अनेकदा या सर्व गोष्टी रेल्वेमधून गायब होण्याच्या घटना देखील घडतात. सर्वच नाही, मात्र असे काही प्रवाशी देखील असतात जे अशा गोष्टी आपल्या बॅगेमध्ये टाकून आपल्यासोबत घेऊन येतात, मात्र तुम्ही जर या वस्तू तुमच्यासोबत घेऊन आलात तर काय होऊ शकतं? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत
दंड आणि जेल
IRCTC जे प्रवाशी रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करतात त्यांना बेडशीट, चादर आणि उशी तसेच टॉवेलची सुविधा देते. सुरुवातीला या साठी जादा पैसे मोजण्याची गरज नव्हती. मात्र आता त्यासाठी देखील तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. याचे चार्जेस देखील तिकिटासोबतच जोडले जातात. मात्र याचा अर्थ हा नाही की, तुम्ही त्यासाठी पैसे दिले आहेत, म्हणजे त्या सर्व वस्तू तुमच्या झाल्या. प्रवास संपल्यानंतर या सर्व वस्तू रेल्वेला वापस कराव्या लागतात, ती रेल्वेची संपत्ती आहे.
मात्र जर चुकून किंवा जाणीवपूर्वक तुम्ही रेल्वेमधील चादर, किंवा बेडशीट, उशी इतर वस्तू तुमच्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पकडले गेले तर तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर तुम्ही दंड भरला नाही तर तुम्हाला एक वर्षांची शिक्षा देखील मिळू शकते, तुमची रवानगी थेट जेलमध्ये होईल, जर तुम्ही पुन्हा असाच गुन्हा केला तर तुम्हाला पाच वर्षांपर्यंत देखील जेल होऊ शकते, त्यामुळे तुम्ही तुमचं सामान आणि बॅग तपासूनच रेल्वेच्या बाहेर पडा.