AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सबरीमाला मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली कार खड्ड्यात पडली, 8 जणांचा मृत्यू, अपघाताला जबाबदार काेण?

सध्या सबरीमाला यात्रेचा हंगाम सुरू आहे, दिवसाला सुमारे 1 लाख यात्रेकरू मंदिराला भेट देतात.

सबरीमाला मंदिरातून परतणाऱ्या भाविकांनी भरलेली कार खड्ड्यात पडली, 8 जणांचा मृत्यू, अपघाताला जबाबदार काेण?
सबरीमाला अपघातImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 24, 2022 | 10:35 AM
Share

चेन्नई, केरळ-तामिळनाडू सीमेजवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक माेठी दुर्घटना (Accident Sabrimala Devotee) घडली. येथील कुमिलीजवळ सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारी व्हॅन उलटून आठ यात्रेकरू ठार झाले. या अपघातात अन्य दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. सर्व यात्रेकरू मूळचे थेनी-अँडीपेट्टीचे रहिवासी होते आणि ते शबरीमालाला भेट देऊन परतत होते.

सबरीमाला मंदिरातून भाविक परतत होते

कुमुली टेकडीवर हा अपघात झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. तेवढ्यात त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे

डोंगरी रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे सर्व लोक जिल्ह्यातील आंदिपट्टी येथील रहिवासी होते.

दररोज 1 लाख भाविक देतात भेट

सध्या सबरीमाला यात्रेचा हंगाम सुरू आहे, दिवसाला सुमारे 1 लाख यात्रेकरू मंदिराला भेट देतात. केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी या दुर्घटनेत आपले जवळचे आणि प्रियजन गमावलेल्या  कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला.

कसा घडला अपघात

डोंगराळ रस्त्यावरील एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हे आठ जण जिल्ह्यातील आंदिपट्टी येथील रहिवासी असून त्यांच्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हे लोकं सबरीमालाहून परतत होते.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...