एकाच दिवसात अख्खं घरच उजाडलं, नातवाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आजोबा जागेवरच कोसळले; भंडाऱ्यात खळबळ
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नातवाचे अचानक निधन झाल्यानंतर आजोबांना धक्का बसला. त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आता नेमकं काय घडलं जाणून घ्या...

रक्ताची नाती ही अतुट असतात. कितीही भांडणे झाली किंवा कितीही वाद झाले तरी ही नाती तोडता येत नाहीत इतकी घट्ट असताता. पण मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे घडलेली एक घटना सर्वांचे मन हेलावून टाकणारी आहे. अचानक नातवाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आजोबांना हे सहन झाले नाही. नातवाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळे आजोबांनी देखील काही वेळात प्राण सोडले. त्यानंतर गावकऱ्यांनी जो काही निर्णय घेतला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नातवाच्या मृत्यूनंतर आजोबांनी सोडले प्राण
नातवाची अचानक प्रकृती बिघडल्यानं उपचार करण्याकरीता त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान नातवाचा मृत्यू झाला. ही बाब आजोबाला माहित होताच नातवाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आजोबानंही प्राण सोडला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालोरा या गावात घडली. नितीन मते असं ४९ वर्षीय नातवाचं नावं आहेत तर, रामचंद्र मते असं ७९ वर्षीय आजोबांचं नावं आहे. या दोघांवर पालोरा गावातील स्मशानभूमीत एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आलं. आजोबा आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार होत असताना उपस्थितांचे डोळे पानावले आहेत.
नेमकं काय घडलं?
नितीन मते यांचे अल्पशा आजारान बुधवारी निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. नितीन हे खासगी वाहन चालक होते. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे मते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण नातवाचे निधन झाल्यानंतर आजोबांना देखील विरह सहन झाला नाही. त्यांचे देखील निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. घरातील मुख्य आधार असलेला नितीन आणि घरातील छत्र असलेले आजोबा रामचंद्र या दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाल्याने मते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.