19, 20, 21, 22, 23, 24 सप्टेंबरला धो-धो पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा हवामान अंदाज आला!
राज्यामध्ये 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर रोजी बऱ्याच भागावर जोराचा पाऊस दिसून येईल. हा पाऊस विखुरलेला असेल. हा पाऊस सर्वदूर नसेल. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या तीन विभागामध्ये 19 सप्टेंबरपासून ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान चांगला पाऊस होईल.

Maharashtra Rain Update : राज्यातयंदा मान्सूनही उशिराने आल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. परंतु आता सप्टेंबर महिना मात्र निराशा करत आहे. मराठवाडा, विदर्भात पिकं कपरून जात आहेत. मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी तर शेतातील सोयाबीनसारखी पिकं उपटून टाकली. अनेक ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच जिथे पाऊस नाही, पिकं होतातून गेली आहेत, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता हवामान, पावसाविषयी माहिती देणारे पंजाबराव डख यांनी पावसाचा महत्त्वाचा अंदाज सांगितला आहे. त्यांनी 17 ते 19 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात पाऊस परतेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस होणार?
राज्यामध्ये 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर रोजी बऱ्याच भागावर जोराचा पाऊस दिसून येईल. हा पाऊस विखुरलेला असेल. हा पाऊस सर्वदूर नसेल. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या तीन विभागामध्ये 19 सप्टेंबरपासून ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान चांगला पाऊस होईल. दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे तसेच बारामती, दौंड, मानखटाव, इंदापूर, बीड, आष्टी, जामखेड, कर्जत, धाराशीव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, जालना या पट्ट्यात 19 ते 24 सप्टेंबरच्या काळात चांगला पाऊस होईल. दक्षिण महाराष्ट्रातून बाष्प सक्रिय झाल्यामुळे हा पाऊस होईल. या काळात दक्षिणमहाराष्ट्राकडून पावसाला सुरुवात होईल. सोलापुरातून हा पाऊस लातूर जिल्ह्यात येईल. हा पाऊस विदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्रातही असेल.
पाऊस शेतकऱ्यांसाठी ठरणार नवसंजीवनी
18 सप्टेंबरनंतर पावसात वाढ होणार आहे. 17 आणि 18 सप्टेंबर या काळात पुणे, मुंबई, कोकण पट्टीच्या भागात पाऊस होईल. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. या पावसाला सुरुवात होण्याआधी शेतकऱ्यांनी शेतातील खुरपणी तसेच इतर कामे करून घ्यावीत, असे आवाहन डख यांनी केले आहे. दरम्यान, डख यांचा अंदाज खरा ठरला तर मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यातील इतर भागातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नवसंजीवनी ठरेल.
