
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा वेस्ट येथील गौड सिटी सोसायटीत सकाळी अद्भूत नजारा लोकांना पाहायवास मिळाला आहे. संपूर्ण परिसरात दाट धुक्याच्या दुलईत हरवलेला दिसत आहे. या सोसायटीत रहाणाऱ्या एका रहिवाशाने त्याच्या टॉवरच्या २३ व्या माळ्यावर त्यांच्या कॅमेऱ्यात हे नयनरम्य दृश्य चित्रित केले असून ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ हे उंच टॉवर धुक्यात हरवलेले दिसत आहेत. जणू काही डोंगरदऱ्यात पसरावे तसे हे धुके पसरलेले दिसत आहेत. खाली झाडे आणि रस्ते पूर्णपणे धुक्यात लपलेली वाटत आहेत. हे दृश्य पाहून येथील रहिवाशांना हिमाचल किंवा उत्तराखंडातील पर्वतात आपण वसलो आहे की काय असे वाटत आहे.परंतू हे दृश्य ग्रेटर नोएडा वेस्टचे आहे.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या वेळी थंड हवा आणि अधिक दवबिंदू पडल्याने दाट धुक्यांचे ढग जमीनीच्या जवळ आल्याने हे घडले असावे. उंच टॉवर्सना पाहून असे वाटत होते की इमारती ढगाच्या समुद्रातून जणू वर येत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल करुन अनेक युजर्सने लिहिले की आता पर्वतातील असे दृश्य पाहण्यासाठी दूर थंड प्रदेशत जाण्याची गरज नाही. ग्रेटर नोएडातच आता स्वित्झर्लंड सारखा अनुभव पाहायला मिळत आहे.निसर्गाचा हा विलोभनीय सोहळा सर्वांना भुलवत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी यास निसर्गाच चमत्कार सांगितला. काही लोकांनी या सौदर्य म्हटले तर काहींनी वाढत्या प्रदुषण आणि हवामानातील बदलाशी याला जोडून पाहिले. तज्ज्ञांच्या मते थंडीच्या वातावरणात आद्रता आणि कमी तापमानाच्या मुळे असे दृश्य दिसू शकते.
हा निसर्गाचा नजारा दिसायला सुंदर वाटत होता. मात्र सकाळी दृश्यमानता कमी झाल्याने रस्त्यांवर वाहने चालवताना समोरील दृश्यमानता कमी झाल्याने कार चालकांना अडचण आली. दाट धुक्यात वाहने चालवताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रेटर नोएडा सारख्या आधुनिक आणि विकसित शहरातील नैसर्गिक दृश्य लोकांना अमुल्य भेट वाटत असली, अनेकांना धुक्याने काळजीत टाकले आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना या दृश्याने निसर्गाच्या जवळ मात्र पोहचवल्याचे म्हटले जात आहे.
येथे पाहा पोस्ट –
Today’s reality.
Video taken from my own balcony.Noida is choking. People are coughing. Children and elderly are at risk.
Yet no one is questioning @myogiadityanath on what concrete steps are being taken to control air pollution in Noida.
All the outrage is directed at… pic.twitter.com/ZBNKrBUjOX
— Himanshu gupta (@hmanshu_gupta) December 14, 2025