दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे रोज इतक्या सिगारेट्स ओढणे, मुंबईची काय स्थिती ?
दिल्लीच्या हवेत किती विष पसरले आहे याचा एक अहवाल आला असून तो खूपच घाबरवणारा आहे. या अहवालानुसार दिल्लीत PM2.5 ची पातळी दररोज 14 सिगारेट्स पिण्याच्या बरोबर आहे. हा आरोग्यासाठी मोठी गंभीर धोका आहे. मुंबई, बंगळुरु आणि चेन्नईची स्थिती काही फारसी चांगली आहे.

राजधानी दिल्लीच्या हवेच्या प्रदुषणाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. दिल्लीकरांच्या श्वासावर जणू विषाची कब्जेदारी आहे. श्वासांच्या या संकटातून बाहेर येण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतू कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही. याच दरम्यान एक रिपोर्ट आला असून तो खूपच घाबरवणारा आहे. AQI.IN च्या आकडेवारीनुसार दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे दररोज १४ सिगारेट्स ओढण्यासारखे आहे. त्यावरुन तुम्ही ओळखू शकता दिल्लीत किती भयानक प्रदूषण आहे.
दिल्लीच्या अनेक मोठ्या शहरातील हवा सातत्याने खराब होत आहे.या संदर्भात AQI.IN ने एक रिपोर्ट जाहीर केला आहे, त्यात दिल्लीची हवा सर्वात खतरनाक असल्याचे म्हटले आहे. AQI.IN च्या आकडेवारीनुसार देशाच्या राजधानीत PM2.5 पातळी अनेक दिवसांपासून 300 µg/m³ आसपास आहे. आंतरराष्ट्रीय मॉडेल नुसार 22 µg/m³ PM2.5 = 1 सिगारेट पिण्याच्या बरोबर आहे.
कशी आहे शहरांची स्थिती ?
या प्रदुषणाचा स्तर पाहता राजधानी दिल्लीत सर्वसामान्य नागरिक सिगारेट्स न पिताही रोज 13 ते 14 सिगारेटच्या धुर फुप्फुसात घालत आहेत. अन्य शहरात देशाची आर्थिक राजधानी मुंबईची स्थितीही काही चांगली नाही. मुंबईत सरासरी PM2.5 8090 µg/m³ प्रमाण आहे. म्हणजे येथे रोज चार सिगारेट्सच्या पातळीचे प्रदुषण श्वासात जात आहे.
बंगलुरुत सरासरी PM2.5 50 µg/m³ पातळीचे प्रदुषण आहे. जे रोज दोन ते तीन सिगारेट्सच्या तोडीचे आहे. चेन्नईत सरासरी PM2.5 40 µg/m³ म्हणजे रोज 2 सिगारेट्स ओढण्याऐवढे प्रदुषण आहे. 22 µg/m³ PM2.5 च्या रोजच्या एक्सपोझरला एक संशोधनात एका सिगारेट्सच्या प्रमाणात मानले गेले आहे. अशी हवा बराच काळ फुप्फुसात राहील्याने श्वसनाचे आजार, हृदयाचे आजार आणि आयुर्मान घटण्याचा धोका वाढतो.
राजधानीची हवा सगळ्यात खराब का ?
जास्त कार आणि औद्योगिक धुराचे प्रमाण
थंडीत धुर जमीनीच्या जवळ अडकणे
शेजारील राज्यात शेतात तण जाळणे
दिल्लीपासून समुद्र दूर असणे
मुंबई आणि चेन्नईची हवा का चांगली ?
समुद्राची हवा प्रदुषणाला कमी करते आणि हवेत आद्रता आणि वेग असल्याने प्रदुषक एका जागी जमत नाहीत.
देशातील शहरांचे कटू सत्य
AQI.IN च्या मते देशातील कोणतेही मोठे शहर WHO च्या सुरक्षित पातळीच्या (5 µg/m³) आसपास देखील नाही. म्हणजे शहरातील माणसे रोज सिगारेट्सची हवा पित आहेत. AQI.IN च्या एका प्रवक्याने सांगितले की आम्ही बर्कली अर्थच्या आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर करतो. आमचा उद्देश्य लोकांना घाबरवणे नाही तर हे समजावणे आहे की प्रदूषण किती गंभीर आहे.
