देशात वेगाने वाढत आहे एलपीजी गॅसचा खप, आकडेवारी आली समोर
भारतात घरगुती एलपीजीचा खप वेगाने वाढत आहे. आणि साल २०२४-२५ मध्य हा ३१.३ MMT च्या रेकॉर्ड स्तरावर पोहचला आहे. गेल्या एक दशकात यात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे.

भारतात घरगुती गॅसची विक्री सातत्याने नवा रेकॉर्ड करत आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग एण्ड एनालिसिस सेल (PPAC)च्या नव्या आकडेवारीनुसार देशात घरगुती एलपीजीचा खप वर्ष 2024-25 मध्ये 31.3 मिलियन मेट्रिक टन (MMT) पर्यंत पोहचला आहे. हा केवळ ग्राहकांच्या मागणीतील वाढीचा संकेत नसून स्वच्छ आणि सुरक्षित कुकींग एनर्जीच्या दिशेने देशव्यापी बदलाचाही मोठा पुरावा म्हटला जात आहे.
का वाढला खप ?
देशात नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी कनेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी अलिकडच्या वर्षात अनेक साऱ्या योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे वेगाने कनेक्शन वाढले आणि खपही वाढला. यातील सर्वात मोठी योजना उज्ज्वला योजना आहे. या योजनेने ग्रामीण आणि आर्थिक रुपाने कमजोर असलेल्या वर्गाला एलपीजीशी जोडले गेले आहे.दुसरीकडे देशात एलपीजीची सप्लाय चेन आधीपेक्षा अधिक सुदृढ झाली आहे. रिफायनरी क्षमता वाढल्याने मोठे वेअरहाऊस आणि चांगल्या वितरण नेटवर्कमुळे रिफीलची उपलब्धता सोपी झाली आहे.

एलपीजीच्या किंमत घसरल्या
कमी दरात गॅस मिळाल्याने विक्रीत वाढ पाहायला मिळत आहे. या महिन्यात गॅसच्या किंमतीत काही बदल झालेला नाही.परंतू कमर्शियल गॅसचे दर जरुर घटले आहेत. आयओसीएलच्या माहितीनुसार महिन्याच्या पहिल्या तारखेला चारही महानगरात १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलींडरचे दर १० रुपयांनी घटले आहेत. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलींडरचे दर घटले आहेत.
या कपातीनंतर देशानंतर राजधानी दिल्लीमध्ये सिलींडरचे दर १,५८०.५० रुपये आणि कोलकाता १,६८४ रुपये झाले आहेत. तर दुसरी कडे मुंबई आणि चेन्नईत कमर्शियल गॅस सिलींडरचे दर १०.५ रुपये कमी झाले आहेत. ज्यामुळे दोन्ही महानगरात कमर्शियल गॅस सिलींडरच्या किंमती अनुक्रमे १,५३१.५० आणि १,७३९.५० रुपये झाली आहे.
