AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांनी रोज 5 कोटी जरी खर्च केले, तर त्यांची संपत्ती संपायला लागतील इतकी वर्षे ? पाहा किती ?

मुकेश अंबानी भारतातलेच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत.त्यांचे दक्षिण मुंबईतील अँटिलिया हे निवासस्थान जगातील सर्वात महागडे खाजगी निवासस्थान आहे.

मुकेश अंबानी यांनी रोज 5 कोटी जरी खर्च केले, तर त्यांची संपत्ती संपायला लागतील इतकी वर्षे ? पाहा किती ?
Mukesh Ambani
| Updated on: Nov 30, 2025 | 10:54 PM
Share

नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि जगातले 16 सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती 113.5 अब्ज डॉलर म्हणजेच 10.14 लाख कोटी रुपये आहे. तुम्ही कधी विचार केला आहे की जर अंबानी यांनी रोज 5 कोटी रुपये खर्च केले तर त्यांची संपत्ती संपायला किती वेळ लागेल. चला याची गणना करुन पाहूयात किती वेळ लागेल ते…..

किती दिवसात संपेल संपत्ती

मुकेश अंबानी यांची संपत्ती तब्बल 1,01,40,00,00,00,000 रुपये इतकी आहे. अशात कोणतीही नवी कमाई न करता ( मग ती व्यापारातून असो व गुंतवणूक वा व्याज किंवा लांभाशातून असो ) मुकेश अंबानी यांनी रोज 5 कोटी रुपये खर्च केले किंवा दान केले तर त्यांची सध्याची संपत्ती संपायला 2,02,800 दिवस (1,01,40,00,00,00,000 ÷ 5,00,00,000) लागतील.

शतके लागतील संपत्ती संपायला

आता आपण वर्षांचा हिशेब केला तर दिवसांना वर्षात कन्व्हर्ट करावे लागेल. त्यामुळे जर 2,02,800 दिवसांना वर्षात बदलले तर (2,02,800 ÷ 365) 555 वर्षे होतात. म्हणजे मुकेश अंबानी यांनी काहीही केले नाही आणि रोज 5 कोटी खर्च केले तर त्यांची एकूण संपत्ती जी सध्या 1,01,40,00,00,00,000 रुपये आहे, ती संपायला 555 वर्षे लागतील.

रिलायन्सचा महसुल किती

मुकेश अंबानी $125 अब्ज मिळकत (महसुल) असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत. त्यांचा व्यवसाय पेट्रो केमिकल्स, इंधन आणि गॅस, टेलिकॉम, रिटेल, मीडिया आणि फायनान्शियल सर्व्हीसेसमध्ये पसरलेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची सुरुवात त्यांचे वडील धीरुभाई अंबानी यांनी 1966 मध्ये एक छोटे टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर म्हणून केली होती. जे एक धागा व्यापारी होते. साल 2002 मध्ये वडीलांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि त्यांचे छोटे बंधू अनिल यांनी कुटुंबांची संपत्ती वाटून घेतली.

जिओ देखील दुसरी होणार लिस्ट

रिलायन्सची टेलीकॉम आणि ब्रॉडबँड सर्व्हीस Jio चे 500 दशलक्षहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. अंबानी यांनी सांगितले आहे की ते जिओला साल 2026 मध्ये शेअर बाजार लीस्ट करण्याची योजना आखत आहेत. साल 2023 मध्ये रिलायन्सने त्यांची फायनान्स ब्रँच Jio Financial Services ला लिस्ट केले होते.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.