Aadhaar Card Update : भारतात आधार कार्ड हे विविध सरकारी योजनांसाठी अनिवार्य आहे. बँकेत, पोस्टात खाते उघडण्यासाठी अथवा काही ठिकाणी ओळख दाखवण्यासाठी आधारचा वापर होतो. पण तुमचे आधार कार्ड वापरून काही गैरप्रकार पण होऊ शकतात. तुमच्या आधार कार्डला तुमचाच मोबाईल क्रमांक जोडल्या गेलेला आहे का? हे एकदा तपासून घ्या. नाहीतर तुमच्या नावावर दुसऱ्याची फसवणूक तिसरी व्यक्ती करणार आणि चौकशीचा ससेमिरा तुमच्यामागे लागणार, असे व्हायला नको.
आधार कार्डला लिंक मोबाईल क्रमांक तुमचाचा आहे की नाही हे अगोदर तपासा. आधार कार्डला जर इतर कुणाचा मोबाईल क्रमांक जोडलेला असेल तर तो लागलीच हटवा. कारण तुमच्या आधारकार्डचा दुरुपयोग होऊ शकतो. त्याचा फटका तुम्हाला ही बसू शकतो. जर आधारला लिंक चुकीच्या मोबाईल क्रमांकवरून काही स्कॅम झाला तर तुमचे नाव समोर येऊ शकते. तेव्हा अलर्ट राहा.
असे तपासा तुमच्या आधारला कोणता मोबाईल क्रमांक लिंक?
- आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे, हे माहिती करणे काही रॉकेट सायन्स नाही. अगदी सहज आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही घरबसल्या सुद्धा ही माहिती ऑनलाईन मिळवू शकतो. त्यासाठी तुम्हाला आधारच्या साईटवर म्हणजे UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- डाव्या बाजूला कोपऱ्यात My Aadhaar ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. मोबाईलवर जर तुम्ही साईट उघडत असाल तर सर्वात वरच्या तीन रेषा दिसतील. त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला My Aadhaar ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर खाली जाऊन
Aadhaar Services वर क्लिक करा. त्यानंतर आता Verify Email/Mobile Number वर क्लिक करा.
- या नंतर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्हाला दोन पर्याय समोर येतील. त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक पडताळाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर कॅप्चर कोड टाकावा लागेल.
- जर तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असेल. तर लागलीच मोबाईलवर नोटिफिकेशन येईल. पण जर दुसरा मोबाईल क्रमांक लिंक असेल तर रेकॉर्ड मॅच होत नाही असे नोटिफिकेशन येईल.