AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke Father: अभिजीत दिपके यांचे वडिल प्रचंड संतापले, थेट सरकाला दिली वॉर्निंग, म्हणाले आता…

Abhijeet Dipke Father: अभिजीत दिपके यांचे वडिल भगवान दिपके यांनी आता दिल्ली पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे, तर सरकारलाही इशारा दिला आहे.

Abhijeet Dipke Father: अभिजीत दिपके यांचे वडिल प्रचंड संतापले, थेट सरकाला दिली वॉर्निंग, म्हणाले आता...
| Updated on: Oct 12, 2026 | 10:43 AM
Share

Abhijeet Dipke CJP: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाले. अभिजीत दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात होता तेव्हा त्यांच्या आजीचे निधन झाले. आता यानंतर अभिजीत दिपके यांचे वडील, भगवान दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर संताप व्यक्त केला.

अभिजीत दिपके यांचे वडिल म्हणाले, “जर दिल्ली पोलिसांनी माझ्या मुलाला वेळेवर सोडले असते किंवा अंत्यविधीनंतर तू पुन्हा दिल्लीला आणि आता जा तू घरी असे म्हणाले असते, तर कदाचित त्याला त्याच्या आजीला भेटायला येऊ शकला असते.”

दिल्ली विमानतळावर अभिजीत दीपकेला ताब्यात घेतल्याप्रकरणी, त्याचे वडील, भगवान दीपके यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकशाहीचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विद्यार्थ्याला विमानातूनच अटक करण्याची ही भारतीय इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भगवान दीपक म्हणाले की, “भारतीय पैसा परदेशात नेणाऱ्या मोठ्या गुन्हेगारांना आणि उद्योगपतींना अटक झाल्याची अशी प्रकरणे त्यांनी कधी पाहिली नव्हती, उलट लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या एका सामान्य विद्यार्थ्यालाच ताब्यात घेण्यात आले.”

देशातील लोकशाहीच्या स्थितीबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, “भारतात लोकशाही अस्तित्वात आहे यावर त्यांचा विश्वास नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘एक राष्ट्र, एक पक्ष’ या दिशेने पुढे जाणे आणि इतर राजकीय पक्षांना संपवणे हे सरकारचे ध्येय असल्याचे” ते म्हणाले.

इंदिरा गांधींच्या काळाची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करताना ते म्हणाले की, “आणीबाणीबद्दल त्यांच्याकडे फारशी सविस्तर माहिती नाही. अभिजीतला दिलेल्या वागणुकीचे निरीक्षण करून ते पुढील पावले उचलतील आणि सरकराला आव्हान आहे हे.” असं म्हणत आता त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

अभिजीत दिपके दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणार होता, पण त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना थेट विमानातून ताब्यात घेतले. विमानातून उतरुही न देता थेट पोलिसांना विमानातून अभिजीत दिपकेला ताब्यात घेतले. अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले.

Follow Us
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!