AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांना मोठा धक्का, या नेत्याने मारली बाजी, थेट मोठी घोषणा..

अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने मोठा धमाका केला. पहिल्याच आंदोलनात त्यांनी केंदीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. मात्र, आता अभिजीत दिपके यांना मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय.

अभिजीत दिपके यांना मोठा धक्का, या नेत्याने मारली बाजी, थेट मोठी घोषणा..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 12, 2026 | 10:07 AM
Share

जंतर मंतरवर मोठे आंदोलन जेनझींचे सुरू होते. या आंदोलनाचा परिणाम असा झाला की, थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनात जेंनझी रस्त्यावर उतरले. शेवटी जेनझींपुढे सरकारला झुकावे लागले. कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढतील. लोकांच्या संपर्कात राहतील आणि लोकांच्या मुद्द्यावर काम करतील. मात्र, यादरम्यान त्यांनी राजकीय पार्टीबद्दल भाष्य केले नाही. आता अभिजीत दिपके यांना मोठा दणका बसला आहे. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी मोठी घोषणा केली. रिपोर्टनुसार, चंद्र कुमार बोस यांनी आजाद हिंद पार्टीच्या नावाने आपला नवीन पक्ष सुरू केला, तशी घोषणा त्यांनी केली.

त्यांच्या म्हणण्यांनुसार, या पार्टीत पूर्ण Z युवक आणि नेताजी यांच्या विचारधारेवर पार्टी असेल. चंद्र बोस यांनी नुकताच एक मुलाखत दिली. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्याच्या 80 नंतर युवकांना रस्त्यावर उतरावे लागले. त्यांना एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात युवकांची भावना बघितली. शिक्षण, आरोग्य आता भ्रष्टाचाराचे नवीन केंद्र बनले आहे.

सर्व राजकीय पक्ष यात आहेत. देशातील युवांना या गोष्टींचा विट आला. त्यांना त्यांच्या अधिकारासाठी लढायचे आहे. नेताजींची आजाद हिंद सैना आणि आजाद हिंद पार्टीच्या नावाखाली अजून यापेक्षा काय चांगले होऊ शकते. यासोबतच त्यांनी दावा केला की, त्यांचा पक्ष सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष,प्रगतीशील विचारधारा असलेला पक्ष असेल, युवकांसाठी मोठे व्यासपीठ असणार आहे.

चंद्र कुमार बोस यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार बघायला मिळाली आहेत. बोस 2016 मध्ये भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, पार्टीने वचन दिले होते की, ते नेताजींचे विचारांचा प्रचार करतील. त्यानंतर त्यांनी भाजपा सोडली. 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान त्यांनी तृणमूल कांग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ममता बनर्जी यांच्याकडे राजीनामा दिला.

Follow Us
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...