मोठी बातमी! अभिजीत दिपके दिग्गज वकिलाच्या भेटीला, आंदोलनाबाबत… महत्त्वाची अपडेट समोर

Abhijeet Dipke : दिल्लीतील आंदोलनात आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला होता. या घटनेनंतर अनेक आंदोलकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. याबाबत आता दिपके यांनी एका ज्येष्ठ वकिलाची भेट घेतली आहे.

मोठी बातमी! अभिजीत दिपके दिग्गज वकिलाच्या भेटीला, आंदोलनाबाबत... महत्त्वाची अपडेट समोर
Abhijeet dipke kapil sibal
Image Credit source: Google
| Updated on: Jul 26, 2026 | 5:58 PM

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वातील कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यातील मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. मात्र या आंदोलनावेळी दिपके यांनी संसदेवर मोर्चा देखील काढला होता. त्यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला होता. या घटनेनंतर अनेक आंदोलकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी आता अभिजीत दिपके यांनी एका दिग्गज वकिलाची भेट घेतली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अभिजीत दिपके कपिल सिब्बल यांच्या भेटीला

दिल्लीतील आंदोलनावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झटापट झाली होती. त्यामुळे पोलि‍सांनी लाठीचार्जही केला होता, तसेच आंदोलकांनीही पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता या गुन्हांबाबत चर्चा करण्यासाठी अभिजीत दिपके यांनी ज्येष्ट वकील आणि काँग्रेसचे खासदार कपिल सिब्बल यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोघांमध्ये आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे.

अभिजीत दिपकेंचे जनतेला आवाहन

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके यांनी जनतेला मोठे आवाहन केले होते. दिपके म्हणाले होते की, ‘मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आज राजीनामा दिला म्हणून मला हिरो बनवू नका. ही चूक करू नका. त्यांच्या राजीनाम्यामुळे मला हिरो बनवू नका. एका व्यक्तीला हिरो बनवण्याच्या प्रवृत्तीमुळेच देशाचे नुकसान झाले आहे.

पुढे बोलताना दिपके यांनी सांगितले होते की, ही पहिला विकेट आहे. आम्ही इथेच थांबणार नाही. ही तर केवळ सुरुवात आहे. गेल्या 36 दिवसांपासून येथे ठामपणे आंदोलन करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना मी सलाम करतो. हा भारताच्या संविधानाचा विजय आहे. हा भारतातील जनतेचा विजय आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे आणि हा याचा पुरावा आहे की, जर तुम्ही घाबरला नाही, तर तुम्ही जिंकू शकता.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us