AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : मोठी गुड न्यूज, राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यात पाऊसच झाला नसल्यामुळे चिंता वाढली होती, मात्र आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Weather expert Punjabrao Dakh) यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

Weather Update : मोठी गुड न्यूज, राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
Punjabrao Dakh rainfall forecast Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 8:33 PM
Share

राज्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या तीस दिवसांपेक्षाही अधिक काळापासून महाराष्ट्रात पाऊसच झालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एवढंच नाही तर पाऊस न झाल्यास जलसाठे देखील संकटात येण्याची शक्यता आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय  झाला आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दबाचा पट्टा विदर्भाकडून कोकणाकडे सरकरणार आहे.  यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे. राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे पंजाबराव डख यांचा नवा अंदाज?

‘शनिवारपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. विदर्भात 11 सप्टेंबरपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस रविवार, सोमवार, मंगळवार 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. ज्यामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यात आता हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे,’ असा हवामान अंदाज यावेळी पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

‘पुढील 24 तासांमध्ये विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला जिल्हा, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा  विदर्भातून मराठवाड्याकडे आणि मराठवाड्याकडून उत्तर महाराष्ट्रात त्यानंतर कोकणाच्या दिशेनं सरकणार आहे. 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नाशिक आणि मुंबई या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात बारा सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळात पावसाचा जोर राहणार आहे. या काळात राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल,’ असा अंदाज देखील हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Follow Us
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल