अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. त्यामध्येच आता अभिजीत दिपके यांनी जंतर मंतर मैदान सोडल्याची माहिती मिळतंय. याबाबत त्यांनी माहिती दिली.

जवळपास एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलनाला सुरूवात केली. जोरदार लढा दिला जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. अभिजीत दिपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. यादरम्यानच आता अभिजीत दिपके यांच्या आरोग्याबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. अभिजीत दिपके यांनी आंदोलकांची माफी मागितली आहे. अभिजीत दिपके यांनी जंतर मंतर मैदान सोडले. अभिजीत दिपके यांनी सांगितले की, ताप आहे आणि शरीरमध्ये खूप जास्त त्रास आहे. 20 जूनपासून जंतर मंतरवर अभिजीत दिपके आंदोलन करत आहेत.
या आंदोलनात लोकांची संख्या सतत वाढत आहे. अभिजीत दिपके यांना आज त्रास सहन होत नव्हता. एक्सवर पोस्ट शेअर करत अभिजीत दिपके यांनी समर्थकांकडे आरामाची मागणी केली आणि माफी मागितली. दिपके यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मला ताप आहे. गेल्या काही दिवसांपासून शरीरामध्ये खूप जास्त त्रास आहे.
मी पेनकिलर खाऊन राहत होतो. मी जर तुम्हाला जंतर मंतरवर दिसलो नाही तर मला माफ करा. मला आराम करण्याची आणि तब्येत व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. मी सायंकाळपर्यंत पुन्हा आंदोलनात सहभागी होईल. आता अभिजीत दिपके यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके जंतर मंतरवर आंदोलन करत आहे.
I’ve been down with a fever and severe body pain for the last few days, but I’ve been pushing through with painkillers.
My apologies if you don’t see me at Jantar Mantar today. I need to get a few hours of rest and recover.
Will be back at the protest site by evening.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 23, 2026
संसदेवर सोमवारी अभिजीत दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी संसदेपर्यंत या मोर्चाला जाऊ दिले नाही. मध्येच थांबवण्यात आला. मात्र, त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यानंतर आंदोलक जंतर मंतरवर परतले. त्यांनी पुन्हा आंदोलनाला सुरूवात केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मागणीवर कॉकरोच जनता पार्टी ठाम आहे. त्यामध्येच आता अभिजीत दिपके आंदोलन स्थलावर नाहीत.