‘जा आणि गळ्यात भाजपचा पट्टा घाला!’ अभिजीत दिपके कुणावर संतापले? ममता बॅनर्जीच्या समर्थनार्थ मैदानात

Abhijeet Dipke Mamata Banerjee : आगामी विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गोठवले. त्यानंतर या निर्णयावर चोहोबाजूने टीका झाली. आता ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मैदानात उतरले आहेत.

जा आणि गळ्यात भाजपचा पट्टा घाला! अभिजीत दिपके कुणावर संतापले? ममता बॅनर्जीच्या समर्थनार्थ मैदानात
अभिजीत दिपके, ममता बॅनर्जी
| Updated on: Sep 22, 2026 | 1:03 PM

ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या स्वायत्ततेवरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. पक्ष चिन्ह गोठवल्याने ममता दीदींनी संताप व्यक्त केला. त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राजकीय विरोधकांनी भाजपासह केंद्रीय निवडणूक आयोगावर तोंडसुख घेतले. त्याचवेळी कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत मुख्य निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गळ्यात भाजपचा पट्टा घालावा अशी अत्यंत आक्रमक भाषा त्यांनी वापरली. दिपके यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या बाजूने उघड पाठिंबा दिला.

इतके कष्ट घेता कशाला?

यावेळी दिपके यांनी शेलक्या शब्दात निवडणूक आयोगाचा समाचार घेतला. आयोगाने इतके कष्ट घेण्याची गरज नाही. आता निवडणूक आयोगाने थेट भाजपमध्ये सहभागी होऊन जावे. आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भाजपमध्ये जावे आणि जेपी नड्डा यांच्या हातून पक्षाचा पट्टा घालून घ्यावा. देशातील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. विरोधी खेम्यात, गोटातू जितकी पक्षा आहेत. त्यांना एकदाच संपवून टाका. त्यांचे निवडणूक चिन्हं आणि पक्ष एकदाच गोठवा. केवळ एकाच पक्षाला निवडणूक लढवण्याची परवानगी द्या. तो एकच पक्ष जिंकावा अशी व्यवस्था करा. या पक्षाविरोधात कोणीच नसेल तर मग ज्ञानेश कुमारजी काम किती सोपं होईल ना? असा सणसणीत टोलाही सीजेपी संस्थापक अध्यक्षांनी लगावला.

निवडणूक चिन्हावरून रणकंदन

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात दोन विधानसभेच्या जागांची पोटनिवडणूक होत आहे. त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे पक्ष चिन्हं गोठावले आहे. निवडणूक आयोगाच्या या कृतीवर ममता दीदी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पक्षाच्या स्वायत्ततेवर गदा आणल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात दिपके हे ममता बॅनर्जी यांच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत.

अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरून आणि सार्वजनिक वक्तव्यावरून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त हे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांना जाणीवपूर्व लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. त्यांच्या या तिखट प्रतिक्रियेची राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us