AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत घडामोडींना वेग, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका कपिल सिब्बल यांच्या भेटीला..

दिल्लीत घडामोडींना वेग आला. त्यातच अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे वकील कपिल सिब्बल यांच्या घरी पोहोचले आहेत. अटीशर्यतीवर यांना जामीन मंजूर झाला. दुपारी दोन वाजता सीजेपीची पत्रकार परिषद आहे.

दिल्लीत घडामोडींना वेग, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका कपिल सिब्बल यांच्या भेटीला..
Abhijit Deepke Saurav Das Ashutosh Ranka
| Updated on: Oct 11, 2026 | 12:03 PM
Share

सीजेपी आक्रमक भूमिका घेत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने 10 ऑक्टोबर रोजी आंदोलन पुकारले. त्यांच्या आंदोलनाला सुरूवात होण्यापूर्वीच अभिजीत दिपके यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विमानतळावरूनच ताब्यात घेण्यात आले. आज 11 ऑक्टोबर रोजीही त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. कॉकरोच जनता पक्षाचे तीन प्रमुख नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची दिल्ली कँट पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सुटका केली. काल पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. अटी आणि शर्तींवर त्यांची सुटका झाली. त्यातील सर्वात मोठी अट समोर आली आहे. पुढील एक वर्ष त्यांच्याकडून शांतता भंग होणार नसल्याची अट असल्याचे कळतंय.

त्यानंतर अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे तिघेही पोलिस ठाण्यात पोहोचले. यादरम्यान माध्यमांनी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी बोलण्यास नकार दिला. तीनही नेत्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला नाही. त्यातच आता कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची पुढची भूमिका नक्की काय असणार? असा सवाल हा उपस्थित केला जात आहे.

त्यातच आता दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या घरी दाखल झाले. तिघांना जामीन काही अटींवर मिळाला आहे. त्याच आता ते चर्चा करण्यासाठी कपिल सिब्बल यांच्या घरी पोहोचले आहेत. तिघांनाही जामीन देण्यात आला. पण त्याकरिता काही अटी ठेवण्यात आल्या.

आज दुपारी दोन वाजता कॉकरोच जनता पार्टीची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत सीजेपी नक्की काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. त्यापूर्वीच अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट केले. कॉकरोच जनता पार्टीचे जंतर मंतरवर आंदोलन होते. सध्या दिल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळतोय. घडामोडींवर चांगलाच वेग आला आहे.

Follow Us
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...