AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

भाजपला धक्का बसला आहे. केरळमधील एका अभिनेत्यानेही भाजपची साथ सोडली आहे. देवन हे भाजपमधून टीव्हीके पक्षात जाण्याची शक्यता आहे.

भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार
bjp flag news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 1:28 PM
Share

थलपती सी. जोसेफ विजय हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यापासून राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. विजय यांच्या पक्षात नेत्यांसहित सेलिब्रिटींची एन्ट्री सुरूच आहे. केरळमधील एका अभिनेत्यानेही भाजपची साथ सोडली आहे. आता अभिनेते देवन हे भाजपमधून आता टीव्हीके पक्षात जाण्याची शक्यता आहे.

टीव्हीके पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेदरम्यान त्यांनी म्हटलं की, मी भाजपसाठी आक्रमकपणे काम करत होतो. अनेक जोखीम घेत होतो. परंतु ते माझी मिशन आणि प्लानिंग समजू शकले नाही. भाजपला या गोष्टींमध्ये रुची नाही. मला वाटतं की, भाजपला निवडणूक जिंकण्यापेक्षा पैसा कमावण्यात रस आहे. याचाच मी विरोध केला’. देवेन यांनी पुढे म्हटलं की, ‘मला पुढे रोखण्यात आलं. 2024 -25 दरम्यान मी पार्टी सोडण्याचा विचार सुरू केला. मी भाजपसोबत राहून राजकारणी म्हणून माझ्या महत्वाकांक्षा पूर्ण होणार नाहीत, असे मला वाटते’.

अभिनेत्याकडून भाजपाचा राजीनामा

‘मी भाजपचा राजीनामा दिला आहे. माझ्या राजीनाम्यानंतर जोसेफ विजय यांनी त्यांचे काही पदाधिकारी माझ्याजवळ पाठवले. त्यांनी माझ्यासोबत टीव्हीके पक्षात प्रवेश करण्याविषयी चर्चा केली. त्यांच्यासोबत दीर्घ चर्चा झाली. चेन्नईत माझी टीव्हीकेच्या वरिष्ठ नेत्यांशी ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीनंतर तत्वत: त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे’. अभिनेते देवेन यांनी पुढे सांगितले की, ‘मी जोसेफ विजय यांची वैयक्तिकरित्या भेट घेऊ इच्छित आहे. मी त्यांच्यासोबत चर्चा करू इच्छित आहे. त्यांच्या भेटीसाठी 10 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मी त्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.

अभिनेता नाराज का होता?

भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी टीम घोषित करण्याआधी अभिनेत्याने पक्ष सोडला. केरळचे भाजप उपाध्यक्ष राहिलेले अभिनेते एस देवन यांनी राजीनामा दिला. त्यांनी 2023 साली कोणतीही पूर्व सूचना न देता उपाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. त्यानंतर 2026 साली त्यांना हटवून आर. श्रीलेखा यांना उपाध्यक्ष यांना करण्यात आलं. त्यानंतर पक्षाने दुर्लक्षित केल्याचा आरोप करत अभिनेते देवेन यांनी राजीनामा दिला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे