सरकारी कर्मचार्यांना मिळणार ॲडव्हान्स सॅलरी, मोदी सरकारची मोठी घोषणा
Government Employees Advance Salary : देशातील लाखा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. त्यांना या 25 सप्टेंबर रोजी म्हणजे उद्याच पगार मिळणार आहे. काय आहे त्यामागील कारण?

देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. यावेळी त्यांचा पगार 25 तारखेला म्हणजे उद्याच त्यांच्या खात्यात जमा होईल. साधारणपणे कर्मचार्यांना महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला वेतन आणि पेन्शनची रक्कम मिळते. यावेळी 25 सप्टेंबर 2026 रोजीच कर्मचार्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिले आहेत. बँक कर्मचार्यांचा संप लक्षात घेता ही तजवीज करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सरकारचा मोठा निर्णय
महिना अखेरीस देशातील बँक युनियनकडून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. विविधा बँक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत संपाचा नारा दिला आहे. संप आणि सुट्यांचे गणित लक्षात घेत बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनचे पैसे मिळण्यात अडचण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना ऐन सणासुदीत पैशांची चणचण भासणार नाही. घर खर्च आणि इतर खर्चासाठी त्यांच्या हाती पैसा राहील.
या विभागातील कर्मचाऱ्यांना होईल फायदा?
वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार, संरक्षण, टपाल खाते, दूरसंचार या विभागासह सर्व केंद्रीय सरकारी विभागांमधील कर्मचार्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. लाखो पेन्शनधारकांनाही याच दिवशी पेन्शन वितरीत होईल. या ॲडव्हान्स वेतनामुळे कर्मचार्यांना ऐन सणासुदीच्या काळात आणि बँकांच्या संपकाळात मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. पुढील महिन्यातील वास्ताविक वेतनाशी या वेतनाचे समायोजन करण्यात येणार आहे.
28-30 सप्टेंबर रोजी संपाची हाक
देशभरातील बँक संघटनांनी पाच दिवसांच्या कामकाज, सप्ताह लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच इतर अनेक मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी 28 ते 30 सप्टेंबर या काळात तीन दिवसांचा देशव्यापी बंदची हाक दिली आहे. ऑल इंडिया ऑफिसर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव डी. एन. त्रिवेदी यांनी बुधवारी या संपाची माहिती दिली. सध्या महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी कर्मचार्यांना सुट्टी असते. आता पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली आहे.