AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची उचलबांगडी? महाभियोग चालणार? 100 हून अधिक खासदारांचं ते मोठं पाऊल

EC Commissioner Gyanesh Kumar impeachment proceedings: केंद्रीय निवडणूक आयोगातील भांडणं चव्हाट्यावर आली आणि त्याअनुषंगाने अनेक बाबी समोर आल्या. त्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात 100 खासदारांनी मोठं पाऊल टाकलं आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची उचलबांगडी? महाभियोग चालणार? 100 हून अधिक खासदारांचं ते मोठं पाऊल
ज्ञानेश कुमार अडचणीत?
| Updated on: Sep 24, 2026 | 7:37 AM
Share

स्वायत्तता आणि कामकाजावरून केंद्रीय निवडणूक आयोगातील भांडण चव्हाट्यावर आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधात इतर दोन आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी तक्रार केल्याचा दावा करण्यात आला. ज्ञानेश कुमार यांनी सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी काम केल्याचा आणि निष्पक्षतेचा भंग केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात संसदेत महाभियोग (Impeachment Motion) आणण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

100 हून अधिक खासदारांची नोटीस

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांनी मोट बांधली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर गेल्या दोन वर्षांपासून विरोधी पक्ष नाराज होते. यापूर्वी दिल्ली आणि मुंबईत आयोगाच्या कार्यालयावर विरोधकांनी मोर्चा काढला आहे. मतदार याद्यांमधील अनियमितता, विरोधी पक्षांच्या तक्रारींकडे सतत दुर्लक्ष आणि निवडणूक चिन्हांच्या वाटपातील पक्षपातीपणा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस प्रकरणात घेतलेली भूमिका यावरून विरोधक नाराज आहेत. त्यांनी ताज्या प्रकरणानंतर ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जवळपास 100 खासदार याप्रकरणी नोटीस देणार आहेत.

महाभियोगाची प्रक्रिया काय?

भारतीय राज्यघटनेच्या कलम 324(5) नुसार, मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीप्रमाणेच संसदेत महाभियोगाची प्रक्रिया राबवली जाते. यासाठी लोकसभेतील किमान 100 आणि राज्यसभेतील 50 खासदारांच्या पाठिंब्याची नोटीस अध्यक्षांकडे सादर करावी लागते. आता इंडिया आघाडीतील खासदार निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झाले आहेत. संसद आणि निवडणूक आयोग यांच्यात सामना होण्याची चिन्हं आहेत.

निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, एसआयआर प्रक्रियेवर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी त्यांचा आक्षेप नोंदवला होता. त्यांनी गेल्या 10 महिन्यात 14 वेळा आक्षेप नोंदवला. निवडणूक आयोगाचे मोठे निर्णय हे मुख्य आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांचे पॅनल घेते. आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. दोघांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून बहुमत नसताना एसआरआय प्रक्रियेसंबंधी निर्णय घेण्यात आले. त्यांचा रोख मुख्य आयुक्तांकडे असल्याचे मानले जाते.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी